कृषी कार्यालयातील रिक्त पदांमुळे योजना रखडल्या आणि शेतकरी झाले हतबल !

 सुनील पाटील
Sunday, 25 October 2020

शेतकऱ्यांना ठिंबक अनुदान देण्यात आले मात्र यातील 609 प्रस्ताव अजूनही शासनाकडे पेंडिंग असल्याने शेतकऱ्यांचे ठिंबक अनुदान शासनाकडे थकीत आहे.

चोपडा : चोपडा कृषी कार्यालयातील कृषी अधिकाऱ्या पासून मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक,लिपिक,सहाय्यक अधीक्षक यासह अनेक पदांच्या जागा रिक्त असल्याने शासनाच्या कृषी विभागाच्या योजना रखडल्या असून यामुळे तालुक्यातील स्थानिक शेतकरी हतबल झाले आहेत एवढेच नाही तर 2019-20 या वर्षातील शेकडो शेतकऱ्यांचे ठिंबकचे अनुदान थकीत असल्याने कर्जबाजारी शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे.प्रभारी पदांवर काम सुरू असल्याने प्रशासनावर ताण पडत आहे.

चोपडा तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकाऱ्याचे एक पद, मंडळ कृषी अधिकाऱ्यांचे दोन पदे,कृषी सहाय्यकाचे 21 पदे,लिपिक तीन पदे,सहाय्यक अधीक्षकाचे एक पद असे एकूण 28 पदांसह अनेक पदांच्या जागा रिक्त असल्याने या रिक्त पदांमुळे योजना रखडलेल्या दिसून येत आहेत.

शेकडो शेतकऱ्यांचे ठिंबक अनुदान थकीत
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत 2019-20 या मागील वर्षाचे 1 हजार 411 प्रस्तावांपैकी 802 प्रस्ताव मंजूर होऊन त्या शेतकऱ्यांना ठिंबक अनुदान देण्यात आले मात्र यातील 609 प्रस्ताव अजूनही शासनाकडे पेंडिंग असल्याने शेतकऱ्यांचे ठिंबक अनुदान शासनाकडे थकीत आहे.2020-21 चे तर अजूनही प्रस्ताव स्वीकारले जात नसल्याची माहिती मिळाली आहे.यामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेला शेतकरी पुन्हा अडचणीत आहे.
 

संपादन- भूषण श्रीखंडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news chopda Vacancies hampered schemes and farmers became helpless