esakal | चोपडा पंचायत समिती सभापतिपदी वर्णी कुणाची? 
sakal

बोलून बातमी शोधा

चोपडा पंचायत समिती सभापतिपदी वर्णी कुणाची? 

राष्ट्रवादीकडून कुणाची वर्णी? चोपडा पंचायत समितीत १२ पैकी राष्ट्रवादीचे पाच सदस्य आहेत. यांपैकी कल्पना पाटील यांना सभापतिपदाची संधी दिली गेली आहे.

चोपडा पंचायत समिती सभापतिपदी वर्णी कुणाची? 

sakal_logo
By
सुनील पाटील

चोपडा : येथील पंचायत समितीच्या सभापती कल्पना यशवंतराव पाटील यांनी  सभापतिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता पुढील सभापतिपदी कुणाची वर्णी लागणार याचीच चर्चा सध्या पंचक्रोशीत सुरू आहे. 

आवश्य वाचा- कोरोनाने अनेकांना बनविले ‘वाहनमालक’! 

चोपडा पंचायत समितीत १२ सदस्य असून, यात पक्षीय बलाबलानुसार राष्ट्रवादीचे पाच, भाजपचे पाच, तर सेनेचे दोन सदस्य आहेत. चोपडा पंचायत समितीवर सुरवातीला भाजप-शिवसेनेची युती होती. यानुसार सभापतिपद भाजपकडे, उपसभापतिपद शिवसेनेकडे गेले होते. आता दुसरी टर्म असून, या वेळीही सभापती व उपसभापती या दोन्ही जागांवर राष्ट्रवादीची वर्णी लागणार असल्याची माहिती मिळाली. मात्र, सहा महिन्यांनंतर पुढील टर्ममध्ये भाजपचा सभापती असणार आहे. 

राष्ट्रवादीकडून कुणाची वर्णी? चोपडा पंचायत समितीत १२ पैकी राष्ट्रवादीचे पाच सदस्य आहेत. यांपैकी कल्पना पाटील यांना सभापतिपदाची संधी दिली गेली आहे. उर्वरित चार सदस्यांमध्ये तीन महिला व एक पुरुष आहे. यात सभापती व उपसभापतिपदावर कुणाची वर्णी लागते? का दोन्ही पदांवर महिलांना संधी दिली जाते, हे नेत्यांवर अवलंबून आहे. मालूबाई गोविंदा रायसिंग (चहार्डी), कल्पना दिनेश पाटील (धानोरा), अमिनाबी रज्जाक तडवी (अडावद) यांच्यापैकी एकाची वर्णी लागण्याची शक्यता आहे. सभापतिपदावर भाजपच्या पाठिंब्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य विराजमान होणार एवढे मात्र निश्चित. 

वाचा- जळगाव जिल्हा रुग्णालयात ‘पोस्ट कोविड ओपीडी’सुरू 
 

पुढील सभापती भाजपचा? 
ही टर्म आटोपल्यावर पुढील सभापती हा भाजपचा राहणार आहे. या वेळी प्रतिभा पाटील यांना सभापतिपदाची संधी दिली जाणार असल्याचे तालुकाध्यक्ष आत्माराम म्हाळके यांनी सांगितले. मौखिक करारानुसार त्या वेळी भाजपकडे सभापतिपद येणार असल्याने प्रतिभा पाटील यांची भाजपकडून सभापतिपदी निवड होण्याची शक्यता आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image