आरोग्याच्या पंचसूत्रीतून "कोरोना'ला रोखणे शक्‍य 

corona
corona

शिरपूर, शिंदखेडा,  ः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वच त्रस्त आहे. हा विषाणू रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, व्हिटामिन सीचा वापर, साबणाचा वापर ही आरोग्याची पंचसूत्री प्रत्येकाने आत्मसात करावीत, असे प्रतिपादन राज्य राखीव पोलिस दल बल गट क्रमांक सहाचे समादेशक संजय पाटील यांनी केले. 

"एसआरपीएफ'तर्फे शिंदखेड्यात येथील लक्ष्मीनारायण कॉलनी परिसरात, तर शिरपूरला प्रभाग क्रमांक नऊमध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या "आर्सेनिक अल्बम' या गोळ्यांचे वाटप केले. शिंदखेड्यात नगरसेवक सुनील चौधरी, शिरपूरचे श्‍यामकांत ईशी, सभापती प्रा. सुरेश देसले, पोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी, नगरसेवक दीपक अहिरे, उदय देसले, सुनील चौधरी आदी उपस्थित होते. 
समादेशक पाटील म्हणाले, की "कोरोना'शी अजून किती दिवस लढावे लागेल, हे अनिश्‍चित आहे. शासन आज ना उद्या सर्व व्यवहार, शाळा-महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेईल. त्यावेळी स्वतःहून काही गोष्टींची सवय लावून घ्यावी. 
कार्यक्रमास कॉलनी परिसरातील महिला-पुरुष फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वितेसाठी तेली समाज युवक आघाडी, श्रीजी प्रतिष्ठान, लक्ष्मी नारायण मित्रमंडळ, जय संताजी युवा मंच, स्वामी विवेकानंद बहुद्देशीय मंडळ, संकेत मराठे, रवी पाटोळे, निखिल पाटील आदींनी प्रयत्न केले. 

दोन हजार पाकीट वाटप 
शिरपूरच्या प्रभाग क्रमांक नऊमध्ये "आर्सेनिक अल्बम' गोळ्यांचे मोफत वाटप केले. राज्य राखीव पोलिस दलाचे समादेशक संजय पाटील यांच्या हस्ते गोळ्याचे वाटप झाले. समादेशक पाटील, डॉ. सुनील ईशी यांनी "कोरोना'वर जनजागृतीपर मार्गदर्शन केले. नगरसेवक प्रभाकर चव्हाण, नगरसेविका छाया ईशी, शामकांत ईशी व श्री संताजी जगनाडे महाराज मित्रमंडळ, महात्मा फुले विधायक मंडळ व प्रांतिक तेली समाज युवक आघाडी आदींनी माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा, नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, युवा नेते तपनभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला. चौधरी गल्ली व माळी गल्लीत गोळ्यांच्या दोन हजार पाकिटांचे वाटप केले. "एसआरपीएफ'चे सहाय्यक समादेशक एन. एन. सोलंके, कमांडन्ट सहाय्यक सदाशिव पाटील, हवालदार अविनाश चंद्रा, जे. एस. चौधरी, जगन्नाथ ईशी, खुशाल चौधरी, नारायण चौधरी, राजेंद्र चौधरी, राजेश भंडारी, संदीप माळी, जयेश महाजन आदी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com