धक्कादायक :  एरंडोलला वाढतोय कोरोना मृत्यू दर...दोन दिवसांत किती मृत्यू वाचा....

धक्कादायक :  एरंडोलला वाढतोय कोरोना मृत्यू दर...दोन दिवसांत किती मृत्यू वाचा....

एरंडोल :  दोन दिवसांत शहरातील एक वृद्ध महिला, वृद्ध पुरुष व मध्यमवयीन पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरासह ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यामुळे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे.

शहरातील नागोबा मढी परिसरातील ८० वर्षीय वृद्धेचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला. तर जहांगीरपुरा परिसरातील ७३ वर्षीय पालिकेच्या निवृत्त कर्मचाऱ्याचा काल सकाळी कोरोनामुळे मृत्यू झाला तर आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास कासोदा दरवाजा परिसरातील चौधरी गल्लीतील ५२ वर्षीय नागरिकाचा देखील कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तिघाही कोरोनाबाधित रुग्णांवर जळगाव येथे उपचार सुरु होते. तिन्ही मृत व्यक्तींवर जळगाव येथेच मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. तालुक्यातील कोरोनामुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या तेरावर पोहोचली आहे.

शहरासह ग्रामीण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यामुळे नागरिकांनी देखील अधिक काळजी घेवून प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. कोरोनाला रोखण्यासाठी शहरात जनता कर्फ्युचे आयोजन करण्याबाबत पालिका सभागृहात सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यापारी, नगरसेवक यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. शहरातील एका राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या वडिलांना कोरोनाची लागण झाल्यानंतर जळगाव येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शासकीय रुग्णालयात रुग्णांवर होत असलेल्या उपचाराबाबत व रुग्णांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने आलेल्या अनुभवाची माहिती बैठकीत सांगितल्यानंतर उपस्थित सर्वच जण सुन्न झाले होते. मात्र शहरातील दोन्ही कोविड सेन्टरमध्ये रुग्णांची अत्यंत चांगल्या पद्धतीने काळजी घेतली जात आहे. मात्र जिल्हा रुग्णालयात रुग्णाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याची भावना या पदाधिकाऱ्याने सर्वांसमोर बोलून दाखवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com