बारावी निकाल : धुळे जिल्‍ह्‍याची बाजी: जळगावचा टक्‍काही वाढला  

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 July 2020

पुणे शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आली. परीक्षेचा निकाल आज दुपारी एकला ऑनलाइन जाहीर करण्यात आला. या निकालात नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश असून, नाशिक विभागातून धुळे जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल लागला आहे.

जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (पुणे) फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज ऑनलाइन जाहीर झाला. नाशिक विभागातून यंदा धुळे जिल्ह्याच्या निकालाची टक्‍केवारी पाच टक्‍क्‍यांनी वाढून विभागातून प्रथम क्रमांकावर आहे. नाशिक विभागातून धुळे जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९१.११ टक्‍के तर जळगाव जिल्‍ह्याचा निकाल ८९.७२ टक्‍के लागला आहे.

पुणे शिक्षण मंडळातर्फे उच्च माध्यमिक प्रमाणपत्राची परीक्षा फेब्रुवारी- मार्चमध्ये घेण्यात आली. परीक्षेचा निकाल आज दुपारी एकला ऑनलाइन जाहीर करण्यात आला. या निकालात नाशिक विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेत नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या चार जिल्ह्यांचा समावेश असून, नाशिक विभागातून धुळे जिल्ह्याचा सर्वाधिक निकाल लागला आहे. यात नाशिक विभागातून सुमारे एक लाख ५७ हजार ३३६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. पैकी एक लाख ३९ हजार ३४६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, नाशिक विभागाच्या निकालाची टक्‍केवारी ८८.८७ टक्‍के आहे. यात धुळे जिल्‍ह्‍यातून २३ हजार ९७४ विद्यार्थी बसले होते. यापैकी २१ हजार ८४२ विद्यार्थी उत्‍तीर्ण झाले आहेत. तर जळगाव जिल्ह्यातील ४६ हजार ९६४ पैकी ४२ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्‍केवारी ८९.७१ टक्‍के आहे. याखालोखाल नाशिक (८९.४६ टक्‍के) आणि नंदुरबार (८०.३५ टक्‍के)असा निकाल आहे. 

मुलींनीच मारली बाजी
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या बारावी परिक्षेत देखील मुलींनीच बाजी मारली आहे. नाशिक विभागात उत्‍तीर्ण होणाऱ्यांमध्ये मुलींची टक्‍केवारी ९२.५४ टक्‍के तर मुलांची टक्‍केवारी ८६.०९ टक्‍के आहे. यामध्ये जळगाव जिल्‍ह्‍यातून मुली ९२.९१ व मुले, ८७.४५ टक्‍के आहे. धुळे जिल्‍हा मुली ९४.०६ व मुले ८९.०४ टक्‍के आणि नंदुरबार जिल्‍हा मुली ९२.५४ आणि मुले ८६.०९ टक्‍के आहे. 

नाशिक विभागाचा बारावीचा निकाल 
जिल्हा...... प्रविष्ट विद्यार्थी...... उत्तीर्ण विद्यार्थी.......टक्केवारी 
नाशिक......७० हजार १२९....६२ हजार ७३४.....८९.४६ 
धुळे........ २३ हजार ९७४.....२१ हजार ८४२....९१.११ 
जळगाव.....४६ हजार ९६४.....४२ हजार १३७.....८९.७२ 
नंदुरबार......१५ हजार ७२२.....१२ हजार ६३३.....८०.३५ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news hsc result nashik divison dhule district first rank