खडसेंच्या सत्कार प्रसंगी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे बड्या नेत्यांची अनुपस्थिती !  

भूषण श्रीखंडे
Monday, 26 October 2020

सत्कार कार्यक्रम ठरवीतांना नेत्यांना विश्वासात घेतले नसल्याने खडसेंच्या पहिल्या स्वागताच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बड्या नेत्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला आहे.

जळगाव ः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकनाथ खडसेंनी मुंबईत शरद पवार यांच्या हस्ते प्रवेश केला त्यानंतर रविवारी जळगाव शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात राष्ट्रवादी महानगरकडून खडसेंचे जोरदा स्वागत केले. मात्र यावेळी राष्ट्रवादीतील जिल्ह्यातील बडे नेते कोणीच दिसले नसून त्यांना या सत्कार कार्यक्रमाचे आयोजनाची माहिती जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांना देखील माहिती नव्हती. त्यामुळे जिल्ह्यातील बड्या नेत्यांची नाराजीची असल्याची एकच चर्चा असल्याची समजतेय.

आवश्य वाचा- भाजपचा व्हाट्सअप गृप झाला राष्ट्रवादीचा, मग काय भाजप कार्यकर्त्यांची झाली पंचाईत !  

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर ते रविवारी पहिल्यांदा जळगाव शहरातील राष्ट्रवादी कार्यालयात आले होते. यावेळी राष्ट्रवादी महानगरकडून त्यांचे जोरदार स्वागतही करण्यात आले आहे. मात्र, या स्वागत सोहळ्याला जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज नेते तसेच जिल्हाध्यक्ष देखील दिसून आले नाही.  तसेच माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉक्टर सतीश पाटील, अरुण गुजराथी, माजी आमदार दिलीप वाघ, आमदार अनिल पाटील राष्ट्रवादीतील बडे नेते देखील दिसून आले नसून त्यांना देखील या सत्कार कार्यक्रमांच्या आयोजनाची माहिती नसल्याने राष्ट्रवादी महानगरच्या स्वागताच्या कार्यक्रमावर जिल्हा नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असल्याचे समजते. यासंदर्भात ॲड. रवींद्र पाटील यांनी म्हणाले, शनिवारी रात्री साडेनऊ वाजता अभिषेक पाटील यांचा फोन आला. त्यांनी सकाळी कार्यक्रम असल्याचे सांगितले पण कार्यक्रम ठरवीतांना विश्वासात घेतले नसल्याचे सांगितले. त्यामुळे जळगाव शहरात खडसेंच्या पहिल्या स्वागताच्या कार्यक्रमाला बड्या नेत्यांची अनुपस्थिती हा चर्चेचा विषय ठरला आहे.

आयत्या वेळी कार्यक्रम ठरला- अभिषेक पाटील
याबाबत राष्ट्रवादी पक्षाचे महानगर प्रमुख अभिषेख पाटील म्हणाले, की खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर रविवारी पहिल्यांदा राष्ट्रवादी कार्यालयात आले. अगदी आयत्या वेळी आणि सकाळी लवकरच हा कार्यक्रम घेण्यात आला असल्याने बाहेर गावी असलेले अनेकजण या ठिकाणी पोहोचू शकलेले नाहीत. परंतू काही दिवसात खडसेंचा स्वागताचा मोठा कार्यक्रम होणार आहे. अचानक कार्यक्रमाचे नियोजन ठरल्याने काही नेते त्यांच्या खाजगी कामानिमित्ताने जिल्ह्याच्या बाहेर, तर कोणी आपल्या गावाला घरी असल्याने कार्यक्रमास्थळी वेळेवर पोहचणे शक्य नसल्याचे सांगितले. 

देवकर समर्थक ही नाराज
शहरातील राष्ट्रवादीच कार्यालयात खडसे यांचा स्वागत कार्यक्रम झाला याचे देवकर समर्थकांना देखील माहिती नव्हते. तर देवकर समर्थकांनी खडसे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे स्वागत केले. 
 

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon absence of NCP district leaders on the occasion of Khadse's felicitation