सुशांतच्या आत्महत्येची बातमी रात्री पाहिली...सकाळी उठून त्यानेही 

sucide
sucide

कळमसरे (ता. अमळनेर) ः वासरे (ता. अमळनेर) येथे सकाळी- सकाळी हृदय पिळवून टाकणारी घटना घडली. अवघ्या पंधरा वर्षीय मुलाने टिव्हीवरील बातम्या पाहून गळफास घेतल्याचा धक्‍कादायक प्रकार उघडकीस आला. चंदन विजय पाटील (वय 15) असे या मुलाचे नाव असून, घरातील सर्वांचा लाडका असल्याने आई- वडीलांनी एकच आक्रोश केला. 
सिनेअभिनेता सुशांत राजपुत याने आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.14) घडली. या संपुर्ण घटनेच्या बातम्या दिवसभर टिव्ही चॅनलवर सुरू होत्या. याशिवाय सोशल मिडीयावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरस झाले होते. इतकेच नाही तर सुशांत फोटो देखील व्हॉटस्‌ऍपवर व्हायरल झाले होते. याचा सारा परिणाम मुलांच्या मनावर करणारा देखील आहे. यातूनच पंधरा वर्षीय मुलाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 

शेतीच्या पाहणीसाठी आई- वडील गेले अन्‌ 
जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे. त्यानुसार विजय धनराज पाटील हे पाऊस झाला असल्याने सकाळी शेतात कामाला गेले होते. तर आई आणि बहीण कापूस लागवडीसाठी दुसऱ्याच्या शेतात रोजंदारीने गेले होते. घरी कुणीच नसल्याने चंदन याने त्याच्या राहत्या घरी सकाळी नऊच्या सुमारास गळफास घेतला. घर पत्र्याचे असल्याने त्याने घरात असलेला कुलरच्या सहाय्याने वर चढून पत्र्याचा शेडला दोर बांधून गळफास घेतल्याचे समजले. 

महिला आली म्हणून उघडकीस आला प्रकार 
गावातील महिला त्यांच्याकडे कामानिमित्त आली. बाहेरून आवाज दिल्यानंतर कोणीच प्रतिसाद दिला नाही. यामुळे महिलेने विजय पाटील यांना भ्रमंणध्वणीवर संपर्क साधत घर बंद असल्याचे सांगितले. यानंतर विजय पाटील हे घरी आल्यानंतर शेजारील दीपक पाटील यांना चंदन हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालय येथे नेले असता त्याला डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. त्याचे शवविछेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलीस पाटील ज्ञानेश्वर पाटील यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

आईचा मन हेलावणारा आक्रोश 
चंदनच्या घरात आई- वडील आणि दोन मोठे भाऊ, बहीण आहेत. चंदन हा घरात सर्वात लहान व लाडका असल्याचे त्याची आई वडील व बहीण यांचा आक्रोश मन हेलावनारा होता. शांत आणि शाळेत हुशार असल्याने सर्व शिक्षकांना देखील या घटनेने धक्‍का बसला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com