मुलीच्‍या अपहरणाला वर्ष उलटले...आता आले फुटेज अन्‌ संशयिताचे रेखाचित्र

kidnapping
kidnapping

जळगाव : जयपूर येथे जायचे असल्याने गाडीच्या प्रतीक्षेत कुटुंबीय जळगाव रेल्वे स्थानकावर (फलाट क्र.३) बसले होते. यादरम्यान पित्याला झोप लागली अन् त्याचा गैरफायदा घेत एका भामट्याने पाच वर्षीय चिमुकलीला खाऊ देण्याचे आमिष देत अपहरण केले होते. एक वर्षापूर्वी घडलेल्या या गुन्ह्याचा अद्यापही रेल्वे पेालिस तपास लावू न शकल्याने तपास स्थानिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आला असून गुन्हेशाखेने मुलीला घेवुन जाणाऱ्या संशयीताच्या सीसीटीव्ही फोटोसहीत त्याचे रेखाचित्र जारी केले आहे. 

स्थानिक गुन्हेशाखेने दिलेल्या माहिती नुसार, गेल्यावर्षी 16 जून 2019 रोजी दुपारी 12.45 वाजता जळगाव रेल्वेस्थानकावर एक तरुण पिता आपल्या पाच वर्षीय मुलीसह आला होता. त्यांना जयपूर येथे जायचे असल्याने फलाट क्रमांक तीनवर ते बसले होते. दिवसभराचा थकवा आणि प्रकृती खराब असल्यामुळे या तरुणास झोप लागली. तर याच दरम्यान, संशयिताने त्याच्या पाच वर्षांच्या मुलीस खाऊ देण्याच्या बहाण्याने बोलावून त्यानंतर तिला सोबत घेऊन संशयित गोवा एक्सप्रेसमध्ये बसून रवाना झाला. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल आहे. वर्ष उलटूनही मुलीचा शोध लागू शकलेला नाही. गुन्ह्याच्या तपासात पोलिसांनी रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्यातील चिमुकलीला घेऊन जाणारा संशयित दिसून येत आहे. त्याचे छायाचित्र तसेच रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. 

चिमुकलीसह संशयिताचे वर्णन असे 
अपहरण केलेली मुलगी पाच वर्षांची आहे. तिची उंची 2 फूट 3 इंच आहे. रंग गोरा, नाक सरळ, मध्यम बांधा, डोळे व केस छोटे आहेत. याप्रकरणी भुसावळ रेल्वे पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अपहरण करणाऱ्या संशयिताचेही फोटो, रेखाचित्र जारी करण्यात आले आहे. संशयित सुमारे 35 ते 40 वयोगटातील आहे. त्यांची उंची 5 ते 6 फूट आहे. रंग सावळा, मध्यम बांधा, नाक सरळ, डोळे मोठे व केस छोटे आहे. हा संशयित अथवा चिमुकलीबाबत काहीही माहिती मिळाल्यास संपर्क क्रमांक 0257 2221790 तसेच 9823019711, 7021502355 या क्रमांकावर कळवावे, असे आवाहन स्थानिक गुन्हे शाखेतर्फे करण्यात आले आहे. 

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com