esakal | अरे देवा… अजून पाच दिवस पावसाची वाट पहावी लागणार 
sakal

बोलून बातमी शोधा

rain waiting

जिल्ह्यात अजून १७ पर्यंत दमदार पावसाची चिन्हे नाहीत. १७ ते २१ दरम्यान मात्र जिल्ह्यात सर्वदूर मध्यमस्वरूपाचा पाऊस पडेल. वास्तविक तो १६ पासूनच सुरू होईल. नंतरचा अंदाज मात्र पाऊस पडल्यानंतर काढण्यात येईल. 
- निलेश गोरे, अध्यक्ष, वेलनेस वेदर फाउंडेशन 

अरे देवा… अजून पाच दिवस पावसाची वाट पहावी लागणार 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत केवळ २३ टक्के पाऊस झाला. अनेक भागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. रोज पावसाचे वातावरण होते मात्र पुरेसा ढग जमा न झाल्याने पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात १७ ते २१ मध्यम जुलै दरम्यान मध्यम स्वरूपाचा चांगला पडण्याची शक्यता जिल्ह्यातील हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे. आय.एम.डी.ने दिलेल्या इशाऱ्यानुसार जुलै महिन्यात जोरदार पावसाची अपेक्षा होती. मात्र तसा पाऊस झालेलाच नाही. हवेतील आर्द्रता वाढल्याने असह्य उकाडा होत आहे. त्यामुळे सारेच हैराण झाले आहेत. 

आवर्जून वाचा - video ; चाळीस मिनिटात गॅसकटरने एटीएम कापून साडेचौदा लाखावर डाका ;१४ लाख ४१ हजार...


आय.एम.डी. इंडिया मेट्रोलॉजीकल डिपार्टमेंट) च्या इशाऱ्यानूसार जळगावसह धुळे, नंदुरबार जिल्ह्यात १० ते १२ जुलै दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज होता. यात काही अपवाद वगळता जिल्ह्यात पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र होते. १३ ते १४ जुलै दरम्यान आता पाउसच येणार नसल्याचे वर्तविण्यात आले आहे. 
 
आद्रता वाढल्याने घामाच्या धारा 
गेल्या ७ जुलैपासून शहरात दिवसभर उन्हाची तीव्रता आहे. सावलीत आले की अंगाला घाम येतो. वातावरणात दमटपणा असल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. आदर्ता ८० ते ९० टक्क्यांपर्यंत पोचली आहे. उन्हाळ्यात आर्द्रता १० ते १२ टक्के असते. आर्द्रता वाढल्याचा परिणाम पंख्यातून बाहेर आले की घामाच्या धारा. वातावरणात आले की उन्हाचा सामना करावा लागत आहे. जोपर्यंत किमान सलग तीन चार तास पाऊस पडून वातावरणात गारवा निर्माण होत नाही तोपर्यंत असे चित्र असणार आहे. 

जिल्ह्यातील ५ दिवसातील तापमान असे 
तारीख--कमाल-- किमान-- आर्द्रता 
७ जुलै---३६--२७.५---७६ 
८--३६.२--२४.५--९५ 
९--३५.६--२५.४--९७ 
१०--३५.२--२६--८७ 
११--३४.२--२५.४--८३ 
१२--३६.२--२५.५--८४