सैन्यदलात अधिकारी सांगीतले..आणि तरुणाला ऑनलाइनचा गंडा

भारतीय सैन्यदलात जम्मू-काश्मीरला नोकरीला असून, अमरावती युनिटला बदली झालेली आहे.
सैन्यदलात अधिकारी सांगीतले..आणि तरुणाला ऑनलाइनचा गंडा


जळगाव : वेगवेगळ्या नंबरचा वापर करून मयूर देवेंद्र चौधरी (वय २६, रा. टेलिफोननगर, जळगाव) या तरुणाची ९५ हजार ९९६ रुपयांचा ऑनलाइन फसवणूक (Online fraud) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गुरुवारी (ता. १) रामानंदनगर पोलिस ठाण्यात (Ramanandnagar Police Station) गुन्हा दाखल झाला. (army officer deceived the young man through online)

सैन्यदलात अधिकारी सांगीतले..आणि तरुणाला ऑनलाइनचा गंडा
जळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णांत साडेचार हजारांनी घट


टेलिफोननगरातील रहिवासी मयूर चौधरी याचे अमरावती शहरात स्वत:चे घर आहे. त्यांनी ‘मॅजिकब्रिक्स’ या वेबसाइटवर नोकरदार कुटुंबास घर भाड्याने देण्याची ऑनलाइन जाहिरात दिली होती. त्यावरून ५ जूनला रणदीप सिंग नाव सांगून एका सायबर गुन्हेगाराने त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधला. मी भारतीय सैन्यदलात जम्मू-काश्मीरला नोकरीला असून, अमरावती युनिटला बदली झालेली आहे. त्यामुळे मला तुमचे घर भाड्याने घ्यायचे आहे, असे सांगितले. बोलणे झाल्यावर घरभाडे अॅडव्हान्स देतो, असे सांगत मयूर चौधरीकडे पेटीएम क्रमांक मागितला, त्यानेही तो दिला.

सैन्यदलात अधिकारी सांगीतले..आणि तरुणाला ऑनलाइनचा गंडा
जम्मू-काश्मीर: सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुलवामात चकमक

क्यूआर कोडने लुटले

मयूरला ११ जूनला रात्री आठला संबंधित व्यक्तीचा फोन आला. एक रुपयाचा क्यूआर कोड पाठवतोय, तो तुम्ही पेटीएमवर स्कॅन करा, त्यानंतर माझा एक रुपया व तुमचा एक रुपया परत येईल, असे तो म्हणाला. त्यानुसार दोन रुपये मयूरच्या खात्यावर आले. त्यानंतर संबंधिताने मयूरला परत क्यूआर कोड पाठविला. या क्यूआर कोडच्या सहाय्याने मयूरच्या पेटीएमवरून १५ हजार ९९९ रुपये असे तीन वेळा व एक वेळा १८ हजार रुपये पाठविले. अशा पद्धतीने एकूण ९५ हजार ९९६ रुपये मयूरच्याच पेटीएमवरून संबंधित व्यक्तीला पाठविण्यात आल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरून गुरुवारी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com