esakal | सलून व्यावसायिक, ग्राहकांसाठी ‘द बार्बर्स एक्स्प्रेस’ 
sakal

बोलून बातमी शोधा

hair salun the barbel express mobile app

ॲप डाउनलोड करून त्यावर सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना मोफत नोंदणी करता येईल. त्या- त्या भागातील ग्राहकही त्यांच्यासाठी असलेले दुसरे ॲप डाउनलोड करून आपल्या पसंतीच्या दुकानावर ही सेवा मिळविण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करू शकतील.

सलून व्यावसायिक, ग्राहकांसाठी ‘द बार्बर्स एक्स्प्रेस’ 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव : कोरोनामुळे अनेक नवीन गरजा निर्माण झाल्या, तशा त्या पुरविणाऱ्या संकल्पनांनीही जन्म घेतला. यातूनच शहरातील मॅनेजमेंटच्या तरुणांनी सलूनवरील गर्दी टाळण्यासह व्यावसायिक व ग्राहकांचा अमूल्य वेळ वाचावा या उद्देशाने ‘द बार्बर्स एक्स्प्रेस’ या अनोख्या ॲपची निर्मिती केलीय. सलून, स्पा व ब्यूटिपार्लरच्या सेवेसाठी ऑनलाइन बुकिंगची सुविधा देणारे ॲप व्यावसायिक व ग्राहक अशा दोघांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

नक्‍की वाचा-  दोन मुले असूनही ती निराधार...पोलिसपाटलाने केला हा प्रकार म्‍हणून वृद्धा दहा किमी गेली पायी
 
प्रमोद चौधरी व स्वप्नील भावसार यांच्यासह त्यांच्या चार- पाच सहकाऱ्यांनी मिळून दोन ॲप व एक वेबसाईट विकसित केले आहे. हे ॲप डाउनलोड करून त्यावर सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना मोफत नोंदणी करता येईल. त्या- त्या भागातील ग्राहकही त्यांच्यासाठी असलेले दुसरे ॲप डाउनलोड करून आपल्या पसंतीच्या दुकानावर ही सेवा मिळविण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करू शकतील. या दोन्ही ॲप, वेबसाइट परस्परांना कनेक्ट असतील. १५ ऑगस्टला हे ॲप लॉन्च करण्यात आले. ग्राहकांसाठीचे दुसरे ॲप दोन- तीन दिवसांत प्ले स्टोअरवर येईल. 

अशा असतील सुविधा 
सलून, स्पा, पार्लर व्यावसायिकांच्या दुकानाचे नाव, त्याठिकाणी मिळणाऱ्या सुविधा, प्रत्येक सेवेसाठी लागणारा किमान वेळ, त्यांचे दर, दुकानाचे फोटो या ॲपवर असतील. ग्राहकांच्या बुकिंगनुसार व्यावसायिकास कोणत्या दिवशी, किती वाजता कोणत्या ग्राहकास, कोणत्या कामासाठी वेळ दिला आहे, हे डिस्प्ले होईल. ग्राहकालाही या सर्व बाबी दिसू शकतील. काही कारणास्तव अपाॅइंटमेंट रद्द झाल्यास ग्राहकास तसे नोटिफिकेशन येईल. यामुळे व्यावसायिकाकडील गर्दी टळेल आणि ग्राहकासही सलूनमध्ये प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही. ॲपवर काही उत्पादनेही बाजारभावापेक्षा कमी दरात उपलब्ध असतील. 

loading image
go to top