esakal | पारोळ्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपाचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

पारोळ्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपाचा निषेध

देशातील शेतकर्यांच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भुमिका ही न्यायाची राहीली आहे.यासाठी 2020 मध्ये शेतकरी हितासाठी हे विधेयक मंजुर करण्यात आले.

पारोळ्यात महाविकास आघाडी सरकार विरोधात भाजपाचा निषेध

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा : राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारने संसदेत पारीत केलेल्या शेतकरी हिताच्या विधेयकाला महाराष्ट्र राज्यात स्थगिती दिल्याच्या निषेधार्थ येथील भाजपा,भाजपा किसान मोर्चा तर्फे सदर घटनेचा निषेध व्यक्त करुन तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.यावेळी स्थगिती आदेशाची होळी कजगांव नाका येथे करुन महाविकास आघाडी सरकार विरोधात पदाधिकारी यांनी घोषणाबाजी केली.

वाचा- हॉटेल्स, रेस्टॉरंटसाठी नवीन नियमावली जाहीर;  बार ९ ते ९ 
 

केंद्र सरकार नेहमीच शेतकरी हिताचा विचार करित आला आहे.देशातील शेतकर्यांच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भुमिका ही न्यायाची राहीली आहे.यासाठी 2020 मध्ये शेतकरी हितासाठी हे विधेयक मंजुर करण्यात आले.परंतु राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सदर आदेशाला महाराष्ट्र राज्यात स्थगिती देवुन शेतकरी विरोधात काम करित असल्याने स्थगिती विधेयकाची होळी करित भाजपा व भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी यांनी आदेशाच्या निषेध केला.यावेळी तालुकाध्यक्ष अँड अतुल मोरे,जिल्हा चिटणीस सुरेंद्र बोहरा,केशव क्षत्रिय,मुकुंदा चौधरी,सचिन गुजराथी,रविंद्र पाटील,किसान आघाडीचे श्याम पाटील,गणेश पाटील,जितेंद्र चौधरी,समाधान पाटील,समीर वैद्य,भावडु राजपुत,यशवंत पाटील,अमोल पाटील,संकेत दाणेज,नरेंद्र साळी यांचेसह पदाधिकारी उपस्थित होते.

संपादन- भूषण श्रीखंडे