शिवसेनेने अखेरच्या क्षणी घेतली माघार; स्थायी सभापतीपदी भाजपचे राजेंद्र घुगे-पाटील बिनवीरोध 

शिवसेनेने अखेरच्या क्षणी घेतली माघार; स्थायी सभापतीपदी भाजपचे राजेंद्र घुगे-पाटील बिनवीरोध 

जळगावः शहर महानगर पालिकेतील स्थायी समितीच्या निवडीत आज अखेरच्या क्षणी विरोधीपक्ष शिवसेनेचे सदस्य नितीन बरडे यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपचे राजेंद्र घुगे-पाटील यांची बिनवीरोध निवड झाली. येथील महानगरपालिकेच्या बहुचर्चित स्थायी समिती सभापती पदी राजेंद्र घुगे पाटील हे निवडून आले आहे. पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी राजेंद्र घुगे पाटील यांची निवड घोषीत करून त्यांचे सॅनीटायझर व मास्क देऊन अभिनंदन केले.

महानगरपालिकेच्या दुसऱ्या मजल्यावर स्थायी समिती सभापती पदाच्या निवडीसाठी सभा घेण्यात आली आणि सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजित राऊत तसेच आयुक्त सतीश कुलकर्णी नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. स्थायी समितीचे सदस्य ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी नितीन बरडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आमची सर्वपक्षीय बैठक झाली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे नेते नितीन लढ्ढा, विरोधी पक्षनेते सुनील महाजन, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी उपस्थित होते. जळगाव शहराच्या विकासासाठी माघार घ्यावी अशी विनंती केल्यामुळे मी या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत माघार घेतली आहे असेही बरडे यांनी सांगितले.

यानंतर जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी राजेंद्र घुगे पाटील यांचा एकमेव अर्ज आल्यामुळे त्यांची सभापतीपदी बिनविरोध निवड जाहीर केली. निवड झाल्यामुळे पीठासीन अधिकारी राऊत यांनी त्यांना सॅनीटायझर व मास्क देऊन त्यांचे अभिनंदन केले.

रंजना सपकाळे महिला बालकल्याण समिती सभापती बिनवीरोध 
महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी रंजना भरत सपकाळे यांचा एकमेव अर्ज आलेला आहे. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्‍चीत होती. दुपारी एकला ही निवडीची प्रक्रिया पार पडली यात पिठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रंजना सपकाळे यांचे बिनविरोध घोषीत करून त्यांना मास्क, सॅनिटायझर देवून अभिनंदन केले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com