चहार्डी ग्रामस्थांसाठी ‘वॉटर एटीएम’; नाणे टाकताच हंडाभर शुद्ध पाणी

सुनील पाटील
Sunday, 9 August 2020

चहार्डी ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून कोळीवाडा व आंबेडकरनगर येथे आरओ मशिन बसविले आहेत. शुक्रवारी (ता. ७) सरपंच प्रमिला सोनवणे यांच्या हस्ते त्यांचे उद्‍घाटन करण्यात आले.

चोपडा : नागरिकांना शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी चहार्डी येथे ‘वॉटर एटीएम’ संकल्पना राबविण्यात आली आहे. या वॉटर एटीएममध्ये पाच रुपयांचे नाणे टाकताच वीस लिटर पाणी मिळते. अशाप्रकारे केव्हाही मुबलक पाणी गावकऱ्यांना उपलब्ध झाले आहे. 
चहार्डी ग्रामपंचायतीने चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून कोळीवाडा व आंबेडकरनगर येथे आरओ मशिन बसविले आहेत. शुक्रवारी (ता. ७) सरपंच प्रमिला सोनवणे यांच्या हस्ते त्यांचे उद्‍घाटन करण्यात आले. या वेळी उपसरपंच तुळशीराम कोळी, ग्रामविकास अधिकारी एस. आर. पारधी, ग्रमापंचायत सदस्य किरण चौधरी, मीना पाटील, संदीप पाटील, वर्षा पाटील, संजय मोरे, इंदू वारडे, प्रशांत पाटील, लीला भिल, जगदीश सोनवणे, रूपाली पाटील, तसेच ग्रामपंचायत कर्मचारी पंकज कोळी, संदीप शिरसाठ आदी उपस्थित होते. 

शेकडो कुटुंबांना फायदा 
ग्रामीण भागातील नागरिकांना अनेकदा दूषित पाण्याचा सामना करावा लागत होता. मात्र, आता केवळ पाच रुपयांमध्ये शुद्ध पाणी मिळत आहे, तेही वीस लिटर. कोरोना संसर्गाच्या काळात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ग्रामपंचायतीने करून दिल्याने या भागातील शेकडो कुटुंबांना याचा फायदा होणार असून, पाण्यामुळे होणारे आजार जवळपास संपुष्टात येणार आहेत.  

 

संपादन ः राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon chahardi gram panchayat crate water atm