रोज नवीन भागात रुग्ण; शहराचा वाढतोय "ताप' 

corona
corona

जळगाव : लॉकडाउनमध्ये शिथिलता मिळताच बाजारपेठेत गर्दी वाढत असून, नवनवीन भागात "कोरोना'चे रुग्ण आढळून येत आहे. आज शहरात 54 नवे रुग्ण आढळून आले असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. 
जळगावात "कोरोना'चा संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू झाला आहे. यातच "लॉकडाउन'मध्ये शिथिलता मिळताच जळगावकरांनी रस्त्यांवर गर्दी सुरू केली असून, शहरातील मार्केटमध्ये तोबा गर्दी होत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगाने सुरू झाला आहे. आज दिवसभरात शहरात "कोरोना'चे 54 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यातील बहुतांश रुग्ण नवनवीन भागात असल्याने महापालिका प्रशासनाची चिंता चांगलीच वाढली आहे. तसेच नवीन भागात रुग्ण आढळून येत असल्याने शहरात कंटेन्मेंट झोनमध्ये देखील आता वाढ झाली आहे. 

आराधना कॉलनीत सर्वाधिक बाधित 
आज आलेल्या अहवालांमध्ये शहरातील आराधना कॉलनीत 9 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. एकाच दिवशी सुमारे नऊ जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हा संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. 

..या ठिकाणी आढळले रुग्ण 
आढळून आलेल्या बाधितांमध्ये आराधना कॉलनी 9, गणपतीनगर 2, पिंप्राळा परिसरातील दांडेकरनगर 2, शिवकॉलनी 2, राधाकृष्णनगर 2, मेहरुण 2, लक्ष्मीनगर 4, चौघुले प्लॉट 4, मेहरुनमधील रामनगर 2, जुने जळगावमधील तेली चौक 5 यासह के. सी. पार्क, अयोध्यानगरातील सद्‌गुरुनगर, प्रेरणा बिल्डिंग, गणेश कॉलनी, चोपडा हॉस्पिटल या ठिकाणावरील प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com