डॉक्टरांना धमकी देणाऱ्यांवर होणार कारवाई : जिल्हाधिकारी राऊत  

Doctors
Doctors

जळगाव : शहरातील डॉक्टरांनी त्यांच्याकडे आलेल्या रुग्णांना जर कोरोना सदृष्य लक्षणे आढळली तर त्यांनी लागलीच महापालिकेच्या आयुक्तांना कळवावे. आमचे नाव महापालिकेला कळवू नका किंवा नाव कळविले तर आम्ही असे करू, तसे करू ’ अशी धमकी देणाऱ्यांवर जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन कारवाई करेल, असा विश्‍वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांच्या बैठकीत दिला. 

आज जिल्हाधिकारी कार्यालयात जनरल प्रॅक्टिशनर डॉक्टरांची बैठक झाली. कोविड रुग्णालयाचे इन्स्टंट अधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, महापालिकेचे आयुक्त सतीष कुलकर्णी, डॉ.धनराज चौधरी यासह इतर डॉक्टर उपस्थित होते. 

अवश्‍य वाचा - तो हुंदके देत म्‍हणत राहिला..वडिलांना हिरावले...आजीही सोडून गेली...आता काय करू...

शहरातील नागरिकांना जर सर्दी, ताप, खोकला झाला तर ते जनरल प्रॅक्टिशनरकडे तपासणीकडे गर्दी वाढली आहे. डॉक्टरांना रुग्णाची तपासणी करताच ती लक्षण कशाची आहेत याबाबत समजते. ते कोरोनोची टेस्ट करण्याचा सल्ला देतात किंवा महापालिकेकडे कळवितात. यामुळे रुग्ण डॉक्टरांमधील कौटुंबिक संबंध बिघडत आहेत. याच कारणामुळे शहरातील अनेक जनरल प्रॅक्टीशनरांनी दवाखाना बंद करून रुग्ण न तपासणीचा निर्णय घेतला. एकीकडे तपासणीत कोरोना संसर्गाची लक्षण दिसली अन ते महापालिकेला कळविले तर रुग्णांशी संबंध खराब होतात, तर दुसरीकडे महापालिका आम्हांला का कळविले नाही म्हणून नोटीस देते? यामुळे जनरल प्रॅक्टिशनर पेचात पडले आहेत. 
 


लागलीच माहिती द्या

रुग्णांना ताप, सर्दी, खोकला झाला म्हणजे ती लक्षण कशाची आहेत? याचा शोध लागला पाहिजे. वेगळा आजार तर नाही ना ? याची तपासणीसाठी अशी लक्षण असलेल्याची माहिती महापालिकेला लागलीच कळवा. महापालिका संबंधितांच्या घरी जाऊन कोरोना संशयित म्हणून टेस्ट करेल. डॉक्टरांनी घरी जाऊन तपासणी करण्याबाबत ना हरकत दाखला दिल्यास, त्या रुग्णाला घरी आयसोलेशन करून घेता येईल. 
 
रुग्णांनी घाबरू नये… 
ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे दिसत असली तरी रुग्णांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. कोरोना शंभर टक्के बरा होता. फक्त त्यासाठी लवकर रुग्णालयात दाखल होऊन उपचार घेण्याची गरज आहे. लक्षणे सौम्य असतील तर रुग्णांना घरीच क्वांरटाईन होता येते. असे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले. 

संपादन : राजेश सोनवणे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com