रुग्ण संख्या घटली तरच ग्रामपंचायत निवडणुका 

gram pamchayat election
gram pamchayat election

जळगाव ः जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून सुमारे ७०० ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका रखडल्या आहेत. त्या ठिकाणी सध्या प्रशासकांची नियुक्ती आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत आहे. आगामी महिन्यातही रुग्णांची संख्या घटतीच राहिल्यास डिसेंबरमध्ये ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेता येतील, असा अभिप्राय जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शासनाकडे पाठविला आहे. 
गेल्या महिन्यापासून राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे राज्यात ज्या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत त्या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया सुरू करता येईल काय किंवा ज्या गावात निवडणूक आहे, तेथील कोरोना संसर्गाची स्थिती कशी आहे, याबाबत अभिप्राय राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडून शासनाने मागविला होता. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी राऊत यांनी वरील अभिप्रायाचा अहवाल पाठविला आहे. 

आणखी एक लाट येण्याची शक्‍यता
कोरोनाची अजून एक लाट येण्याची शक्यता काहींनी वर्तविली आहे. मात्र आरोग्य विभागाच्या मते आता पुन्हा कोरोनाबाधित वाढणार नाही, अर्थात कोरोना संसर्गाची लाट येणार नाही अशी आशा आहे. यामुळे आगामी काळ कोरोना संसर्गमुक्तीचा असेल. मात्र त्यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळणे महत्त्वाचे आहे. 

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे, ही चांगली बाब आहे. प्रत्येक नागरिकाने तोंडाला मास्क लावून व्यवहार केले, गर्दीत जाणे टाळले, वारंवार हात धुतले तर कोरोना संसर्ग होणार नाही. स्वयंशिस्त पाळली तर आगामी काळातही आपण कोरोनाला हरवू. 

-अभिजित राऊत, जिल्हाधिकारी 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com