स्तुत्य उपक्रम : शवविच्छेदन करणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते ध्वजावंदन 

स्तुत्य उपक्रम : शवविच्छेदन करणाऱ्या व्यक्तीच्या हस्ते ध्वजावंदन 

चोपडा :वेले (ता चोपडा ) येथे असलेल्या मानव सेवा तीर्थ या संस्थेकडून दरवर्षी दुर्लक्षित घटकाच्या हस्ते ध्वजारोहण केले जात असुन दुर्लक्षित घटकास आमंत्रित करुन ध्वजारोहणसाठी सन्मान दिला जातो.

देशाच्या 74 व्या स्वातंत्र्य दिननिमित्त म्हणजेच 15 आगस्टचे ध्वजारोहण चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करणारा प्रशांत पुरुषोत्तम पाटील ( उर्फ मामू ) यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.अमर संस्था संचालित मानव सेवा तीर्थ हि संस्था समाजातील दुर्लक्षित घटकासाठी अहोरात्र कार्य करीत आहे .सदर संस्था रस्त्यावर फिरणारे मनोरुग्ण, वेडसर लोकांसाठी दीपस्तंभचे कार्य करीत आहे. आतापर्यंत 100 मनोरुग्ण बरे होऊन सामान्य जीवन जगत आहेत तर सदयस्थितिला 50 मनोरुग्ण उपचार घेत आहेत. त्यांच्या सेवेत एन आर पाटील सह अनेक कार्यकर्ते सेवा देत आहेत.


दरवर्षी सदर संस्थेच्या ध्वजारोहण प्रसंगी समाजातील दुर्लक्षित घटकास आमंत्रित करुन ध्वजारोहणसाठी सन्मान दिला जातो .समाजमनाची जाणीव ठेवत चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन करणारे प्रशांत पुरुषोत्तम पाटील(मामु) यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचा मान देवून त्यांच्या कामाचा गौरव संस्थेतने केला.

संपादन-भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com