esakal | जळगाव जिल्ह्यात एक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा पाचशे आत
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात एक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा पाचशे आत

कोरोनाचे नविन रुग्णसंख्या जिल्ह्यात वाढू लागली होती. कोरोनाची ही लाट आता आठवडाभरापासून ती थोडी नियंत्रणात आल्याचे चित्र सद्या दिसत आहे.

जळगाव जिल्ह्यात एक्टिव्ह रुग्णसंख्या पुन्हा पाचशे आत

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या घटत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. शनिवारी (ता. ५) जिल्ह्यात नवे २४ रुग्ण आढळले, तर ४७ रुग्ण बरे झाले. दिवसभरात दोन रुग्ण दगावला. 

दिवाळीनंतर कोरोनाची पून्हा लाट येणार अशी शक्यता आरोग्य विभागाने वर्तवली होती. त्यानुसार कोरोनाचे नविन रुग्णसंख्या जिल्ह्यात वाढू लागली होती. कोरोनाची ही लाट आता आठवडाभरापासून ती थोडी नियंत्रणात आल्याचे चित्र सद्या दिसत आहे. शनिवारी प्राप्त चाचणी अहवालात २४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५४ हजार ७६२ झाली आहे, तर ४७ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा ५२ हजार ९७७ वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत जळगाव शहरातील ५९ वर्षीय तर पाचारो तालुक्यातील ६८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. 

जळगाव, भुसावळ, चाळीसगावला संख्या झाली कमी 
जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये किरकोळ संख्येत रुग्ण आढळून येत असताना जळगाव शहरासह भुसावळ व चाळीसगाव तालुक्यात मात्र सातत्याने नवे बाधित समोर येत आहेत. शुक्रवारीही भुसावळला १२, चाळीसगाव येथे १३ रुग्ण आढळले, तर जळगाव शहरात आठ नवे बाधित सापडले. आज मात्र जळगाव शहरात ५, चाळीसगाव ६, जामनेर ४, भुसावळ २, भडगाव २ तर अमळनेर, चोपडा, पाचोरा, रावेर या तालुक्यांत प्रत्येकी एक, इतर १ असे रुग्ण आढळले. 

loading image