जळगाव जिल्ह्यात ‘आओ... जावो... घर तुम्हारा’ 

lockdown
lockdown

जळगाव : जिल्ह्यात परप्रांतातून येण्यास आता कोणतीच बंधने नसल्याचे विदारक चित्र आहे. परराज्यातून जिल्ह्यात येण्यासाठी लागणारे पास देणेही बंद झाले आहे. यामुळे जिल्ह्यात कोरोना महामारीत ‘कोणीही यावे अन्‌ जावे’ असे चित्र आहे. येण्या-जाण्यावर निर्बंध नसल्याने जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यातून तब्बल ५९ हजार १५९ नागरिक परजिल्हा व राज्यात गेले आहेत. 
२४ मार्चपासून देशात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर झाला. विमान, रेल्वे, बस, खासगी वाहने बंद करण्यात आली. दोन महिन्यांनंतर परराज्य, परजिल्ह्यातील मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यासाठी रेल्वे, बसची व्यवस्था करण्यात आली. मूळगावी जाण्यासाठी संबंधित व्यक्तींना ऑनलाइन पासची सोय करण्यात आली. ऑनलाइन अर्ज भरताना संबंधितांना कोणताही आजार नाही, याबाबत डॉक्टरांचे प्रमाणपत्र जोडावे लागत होते. त्याशिवाय परवानगी मिळत नव्हती. परवानगीसाठी लांबच लांब रांगा लागत होत्या. नागरिक महाराष्ट्रातील कोणत्या गावात येत असेल किंवा राज्यात इतर ठिकाणी जात असेल आणि तो परिसर कंटेन्मेंट झोन असेल तर संबंधितांना जाण्या-येण्याची परवानगी दिली जात नसे. 

पास कशासाठी? 
दीड महिन्यापासून जळगाव जिल्ह्यात येणाऱ्या व जाणाऱ्यांना पोलिस सीमेवर, जिल्ह्यात व गावात अडवत नाहीत. यामुळे नागरिक खासगी वाहनांनी राज्य व राज्याबाहेर जाणून चक्क फिरून येतात. तेही विनापास. एका राज्यातून, जिल्ह्यातून दुसऱ्या ठिकाणी जाताना कोणी हटकत नसेल, तर पास काढण्याच्या भानगडीत कोण पडणार, अशी धारणा नागरिकांची आहे. 

अधिकाऱ्यांची नियुक्ती केली तरी... 
पुणे येथून अमळनेर तालुक्यात एक युवक चक्क १५ दिवस राहिला. त्याच्यापासून त्याचे कुटुंब व संपर्कातील अनेकांना कोरोना झाला. अशाच प्रकारे परराज्यातून, जिल्ह्यातून आजही नागरिक पासविना येत आहेत. त्याबाबत कोणी विचारतही नाही. कोण केव्हा येतो व जाताे, हे कळतही नाही. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात येणाऱ्या-जाणाऱ्यांची माहिती ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणुका केल्या. मात्र, त्यातून किती जण शोधले व इतर कोरोनाच्या संसर्गापासून वाचले, असा प्रश्‍न यानिमित्त उपस्थित होत आहे. 

या आहेत उपाययोजना 
- जिल्ह्यात येणाऱ्यांना प्रत्येकाला पास गरजेचे 
- जिल्ह्यात येणाऱ्यांना १४ दिवस घरीच क्वारंटाइन करणे 
- मास्क, सॅनिटायझरच्या वापरावर लक्ष 
- न वापरणाऱ्यांवर जागीच कारवाई अपेक्षित 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com