कोरोना रुग्णांची बिले तपासणीसाठी भरारी पथके

कोरोना रुग्णांची बिले तपासणीसाठी भरारी पथके

जळगाव : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात दाखल कोरोना व इतर आजारांच्या रुग्णांची बिले तपासणीसाठी जिल्ह्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. महापालिका क्षेत्रातील पथकाची नियुक्ती महापालिका आयुक्त करतील, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

खासगी रुग्णालयात विविध उपचारासाठी आकारावयाचे कमाल दर शासनाने निश्चित केले आहेत. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू केली आहे. खासगी वाहने, रुग्णवाहिका अधिग्रहीत करून शासनाने त्यांचे कमाल दर निश्‍चित केले आहेत. खासगी रुग्णालयांना खाटा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या आहेत. विहित दरापेक्षा अधिक शुल्क आकारण्यात येत असल्याबाबत शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. शासन दरानेच शुल्क आकारण्याची अंमलबजावणी काटेकोरपणे होते किंवा नाही याच्या तपासणीसाठी या पथकाची नियुक्ती केली आहे. 

असे आहे भरारी पथक 
पथकप्रमुख प्रांताधिकारी, सदस्य निवासी नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक, उपकोशागार अधिकारी, अव्वल कारकून, तलाठी. 
 
भरारी पथकाने शासन निर्णयाप्रमाणे सूचनांचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही याची खातरजमा करावी. खासगी रुग्णालयांना दरपत्रक रुग्णालयाच्या अग्रणी भागास लावण्यास सांगावे. पथकाने खासगी रुग्णालयांकडून रुग्णांना देण्यात येणारी देयके अंतिम देण्यापूर्वी तपासणीसाठी लेखापरीक्षण पथकाच्या सहाकार्याने विहित दर लावला किंवा नाही याची खातरजमा करावी. महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व खासगी रुग्णालयांनी दाखल होणाऱ्या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे अपेक्षित आहे. याची तपासणी करावी. पथकाने संबंधित रुग्णालयाचा अहवाल तीन दिवसांत द्यावा. 

तपासणी दर असे 
खासगी प्रयोगशाळांनी कोविड ‘आरटीपीसीआर’ तपासणी दर शासनाने निश्‍चित केलेल्या दरापेक्षा अधिक आकारू नयेत, असे आदेश शासनाने काढले आहेत. त्यानुसार जमा केलेले सॅम्पल घेऊन प्रयोगशाळेत देणे एक हजार ९०० रुपये, सॅॅम्पल कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पिटल, क्वारंटाइन सेंटरमधून जमा करणे दोन हजार २००, तर रुग्णांचे घरून सॅम्पल घेऊन लॅबमध्ये देणे दोन हजार ५०० रुपये असे दर आहेत. 

खासगी प्रयोगशाळांना कोरोनासाठी रॅपिड ॲन्टिबॉडी टेस्ट व रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट किट वापरणे बंधनकारक केले आहे. या तपासण्यांचे कमाल दर निश्‍चित केले आहेत.

ते असे  
तपासणी प्रकार--रुग्ण स्वतः प्रयोगशाळेत आल्यास--तपासणी केंद्रावर नमुना घेतल्यास--रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेतल्यास ईएलआयएसए फाॅर ॲन्टिबॉडी टेस्ट --४५०--५००--६०० 
सीएलआयए फॉर ॲन्टिबॉडी टेस्ट --५००--६००--७०० 
रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट--६००--७००--८०० 
 

संपादन-भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com