जिल्ह्यात कोरोना बाधितांचा सतरा हजारांचा आकडा पार 

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा सतरा हजारांचा आकडा पार 

जळगाव : सलग पाचव्या दिवशी पाचशेपेक्षा अधिक रुग्ण सापडण्याची मालिका आजही सुरुच होती. दिवसभरात तब्बल ५९५ रुग्ण बाधित आढळून आले तर आजपर्यंतचे दिवसातील सर्वाधिक ४०३ रुग्ण बरेही झाले. त्यामुळे एकीकडे एकूण रुग्णसंख्या १७ हजार १३१ झाली असून बरे झालेल्यांचा आकडा ११ हजार ७२८ वर पोचला आहे. 


गेल्या २४ तासांत ९ रुग्णांचा मृत्यू झाला, त्यामुळे एकूण बळींची संख्याही ६४७ झाली आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. आरटीसीपीआर व ॲन्टीजेन अशा दोन्ही स्वरुपाच्या तपासण्यांमुळे चाचण्यांची संख्या वाढली असून त्या बरोबरीने रुग्णसंख्याही वाढत आहे. आज सलग पाचव्या दिवशी पाचशेपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले. त्यामुळे जिल्ह्याची वाटचाल आता २० हजारांच्या आकड्याकडे होऊ लागली आहे. 

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर १४४, जळगाव ग्रामीण २१, भुसावळ ७, अमळनेर ७७, चोपडा २५, पाचोरा २७, भडगाव ६, धरणगाव ४०, यावल ६, एरंडोल ६५, जामनेर ३५, रावेर ७, पारोळा ५३, चाळीसगाव ३०, मुक्ताईनगर ४१, बोदवड २, इतर जिल्ह्यातील ९. 

जळगावात बरे होणारे अधिक 
जिल्ह्यात पाचशेवर रुग्ण आढळून येत असताना गेल्या काही दिवसांपासून सर्वाधिक रुग्ण आढळून येण्यात जळगाव शहर आघाडीवर व कायम आहे. शहरात चार-पाच दिवसांपासून शंभर, दीडशे रुग्ण आढळून येत आहेत. आजही १४४ रुग्ण आढळून आले. मात्र, शहरात दिवसभरात बरे झालेल्यांची संख्या आज नव्या बाधितांपेक्षा जास्त होती. जळगाव शहरातील १८१ रुग्ण आज बरे झाले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ४२४४ झालेली असताना बरे झालेल्यांचा आकडाही २९८५ एवढा आहे. 

एरंडोल तालुका हजाराच्या टप्प्यात 

एरंडोल : तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून रुग्णसंख्या ९५१ वर पोहोचली आहे.आज प्राप्त झालेल्या अहवालात २० जण बाधित आढळून आले असून यामध्ये शहरातील १२ तर ग्रामीण भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. शहरातील जोहरी गल्ली, पांडववाडा परिसर, गांधीपुरा, विद्यानगर, नम्रता नगर, रामचंद्र नगर, नागोबा मढी, लक्ष्मी नगर, काशी पुनमचंद नगर, जहांगीर पुरा परिसरात रुग्ण आढळले. तसेच ग्रामीण भागातील विखरण, सोनबर्डी, धारागीर, वरखेडी, पिंपळकोठा या गावातील रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 

धरणगावातही संसर्ग वाढतोय 
धरणगाव : तालुक्यात आज नव्याने ५० रुग्णांची वाढ झाली. आता एकूण ८५५ रुग्ण झालेले आहेत. यापैकी ५६७ रुग्ण बरे झाले असून २५४ उपचार घेत आहेत. यात १७४ ग्रामीण तर ८० शहरी भागातील रुग्ण आहेत. यापैकी २४ जणांचा मृत्यू झाला आहे. जुलैअखेरीस तालुक्यात ५०६ रुग्ण होते, गेल्या १३ दिवसात जवळपास ३५० रुग्णांची वाढ झाल्याची माहिती 
तहसीलदार नितीन देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ यांनी दिली. 
 

संपादन-भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com