esakal | बाधितांपैकी ८४ टक्के मृत्यू  ५० पेक्षा जास्त वयोगटांतील 
sakal

बोलून बातमी शोधा

corona death

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.३३ टक्के आहे, तर उपचारादरम्यान आतापर्यंत ५९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण ४.३६ टक्के आहे.

बाधितांपैकी ८४ टक्के मृत्यू  ५० पेक्षा जास्त वयोगटांतील 

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव : जिल्ह्यातील ज्या नागरिकांना कोरोनासदृश्य लक्षणे जाणवत असतील त्यांनी त्वरित कोरोनाची तपासणी करून घ्यावी. जेणेकरून त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करून कोरोनाची साखळी तोडण्यास मदत होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. 

जिल्ह्यात आतापर्यंत १३ हजार ५७४ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्वरित तपासणी, निदान आणि उपचारामुळे यापैकी नऊ हजार ३४४ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६८.३३ टक्के आहे, तर उपचारादरम्यान आतापर्यंत ५९२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण ४.३६ टक्के आहे. मात्र, एकूण मृत्यूंपैकी ८४ टक्के म्हणजेच ४९९ रुग्ण हे ५० पेक्षा जास्त वयोगटांतील होते, असे निदर्शनास आले आहे. एकूण मृत्यूंपैकी आजारपण असलेले ३०४ मृत्यू असून, याचे प्रमाण ५१.३५ टक्के इतके आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील ५० पेक्षा अधिक वयोगटांतील ज्या नागरिकांना कोरोनासदृश्य लक्षणे आढळून येत असेल त्यांनी त्वरित कोरोनाची तपासणी करून घ्यावी. 
 
जिल्ह्यात ९२२ बेड उपलब्ध 
जिल्ह्यात आढळून येत असलेल्या बाधित रुग्णांवर योग्य ते उपचार व्हावेत, त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता प्रशासनाने जिल्ह्यात कोविड केअर सेंटर, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटर, डेडिकेटेट कोविड हॉस्पिटल सुरू केलेले आहेत. याशिवाय खासगी रुग्णालयांना उपचाराची परवानगी दिली आहे. अनेक संस्थांना संस्थात्मक विलगीकरण सेंटर सुरू करण्यासही परवानगी दिली आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचाराची कोणतीही अडचण नाही. सद्यःपरिस्थितीमध्ये जिल्ह्यात ९२२ बेड उपलब्ध असून, यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये १५४, डेडिकेटेट कोविड हेल्थ सेंटरमध्ये ४७५, तर डेडिकेटेट कोविड हॉस्पिटलमध्ये २९३ बेड उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाला घाबरू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राऊत यांनी केले आहे. 

संपादन : राजेश सोनवणे

loading image
go to top