esakal | जळगाव जिल्ह्यात दोन शिक्षकांसह चौघे कोरोना पाॅझीटीव्ह 
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात दोन शिक्षकांसह चौघे कोरोना पाॅझीटीव्ह 

५ हजार २७८ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली,आरटीपीसी चाचणीत जिल्हयात दोन शिक्षक व दोन शिक्षकेतर कर्मचारी यांचे अहवाल पॉझीटीव्ह आढळले आहेत.

जळगाव जिल्ह्यात दोन शिक्षकांसह चौघे कोरोना पाॅझीटीव्ह 

sakal_logo
By
कैलास शिंदे

जळगाव : जळगाव जिल्ह्यात शिक्षकांची ‘कोरोना’तपासणी करण्यात आली असून दोन शिक्षक व दोन शिक्षकेतर कर्मचारी पॉझीटीव्ह आढळून आले आहे. उद्या (ता. २३ )पासून शाळा सुरू होणार असून ९वी ते१२वीपर्यंचे चार वर्ग भरणार आहेत. 

‘कोरोना’ची साथ सुरू झाल्यानंतर राज्यभरात शाळा बंद करण्यात आल्या होत्या. मात्र आता शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील शाळाही आता सुरू होणार आहेत.नववी ते बारावी पर्यंत चार वर्ग भरणार आहेत. यात गणित, सायन्स व इंग्रजी विषय शिकविण्याला प्राध्यान्य देण्यात येणार आहे. 

शिक्षकांची तपासणी 
जिल्हयातील सर्व माध्यमिक शाळातील ९ वी ते बारावी पर्यतंचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. त्यातही गणित,सायन्स, इंग्रजी शिकविण्यावर भर देण्यात येणार आहेत. हे विषय शिकविणाऱ्या शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली आहे. एकूण ५ हजार २७८ शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली,आरटीपीसी चाचणीत जिल्हयात दोन शिक्षक व दोन शिक्षकेतर कर्मचारी यांचे अहवाल पॉझीटीव्ह आढळले आहेत.यात भुसावळ येथे एक शिक्षक तर दोन शिक्षकेतर कर्मचारी तसेच जळगाव तालुक्यात भादली येथे एक शिक्षक पाझीटीव्ह आढळला. या पूर्वी शिक्षकांची करण्यात आलेल्या रॅपीड चाचणीत एकही शिक्षक पॉझीटीव्ह आढळला नाही. त्यानंतर र.टी.पी.सी.चाचणी करण्यात आली. 


पालकांचे समंतीपत्र आवश्‍यकच 
सोमवार (ता. २३)पासून नववी ते अकरावी पर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबतचे पालकांचे संमतीपत्र सक्तीचे करण्यात आले आहे. पालकांचे संमतीपत्र असेल तरच विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. 

शाळेत सॅनेटायझर फवारणी 
शाळा सुरू होण्याअगोदर शाळेत प्रत्येक वर्गात सॅनेटायझर फवारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.विशेष म्हणजे शाळेतील वर्गात फवारणी केल्याचे फोटो मोबाईलवर शिक्षणाधिकाऱ्यांना टाकण्याची सक्ती करण्यात आली आहे. त्या शिवाय स्थानिक ठिकाणी ग्रामसेवकांनी शाळेतील वर्गात फवारणी करून द्यावी अशी त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांची गर्दी कमी करण्यासाठी अकरावी व बारावी सकाळी तर नववी व दहावी दुपारी भरविण्याचे आदेश देण्यात आले आहे. वर्गात एका बेंचवर केवळ एकच विद्यार्थी बसणविण्यच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

जिल्ह्यातील नववी ते बारावी पर्यंचे चार वर्ग सोमवार(ता.२३)पासून सुरू करण्यात येणार आहेत. यात ‘कोरोना’च्या पाश्‍र्वभूमीवर सोशल डिस्टीसिंगसह सर्व नियम पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षितेतेबाबत सर्व काळजी घेण्यात येत आहे. 
भास्कर पाटील 
शिक्षणाधिकारी माध्यमिक 
जिल्हा परिषद, जळगाव 

loading image