corona virus recover
corona virus recover

दिलासादायक : कोरोनामुक्‍तचे प्रमाण ७५ टक्‍क्‍यांवर

जळगाव : जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७५.०४ टक्क्यांवर पोहोचले आहे. सध्या ९ हजार ८६० ॲक्टीव्ह रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असून पैकी ३ हजार ४९४ रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आत्तापर्यंत १ लाख ८३ हजार ८०८ संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ॲक्टीव्ह रुग्णांची संख्याही दिवसेंदिवस कमी होत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ‘सकाळ’ला दिली. 

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली आहे. जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे ८६ हजार ९२६ तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे ९६ हजार ८८२ अशा एकूण १ लाख ८३ हजार ८०८ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी १ लाख ३८ हजार ६३ चाचण्या निगेटिव्ह तर ४३ हजार ८९७ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या. इतर अहवालांची संख्या १ हजार ८८ असून ७६० अहवाल प्रलंबित आहेत. 

९ हजारांवर बाधीतांवर उपचार 
सध्या ९ हजार ८६० बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये ४ हजार ८९० रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ८०७, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ६६९ रुग्ण उपचार घेत आहेत. ३ हजार ४९४ रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत. शिवाय विलगीकरण कक्षातही ४३८ रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले ८ हजार ३८४ रुग्ण असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार ४७६ इतकी आहे. यापैकी ६६९ रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरू असून २८७ रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे. 

१६४३ ऑक्सिजन बेड 
आतापर्यतच्या बाधित रुग्णांची संख्या ४३ हजार ८९७ इतकी झाली आहे. यापैकी ३२ हजार ९४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आज एका दिवसात १६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत १ हजार ९६ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा २.५० टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीसी व इतर रुग्णालयांमध्ये १२ हजार ८५४ इतके बेड आहेत. यात २६३ आयसीयू बेड तर १ हजार ६४३ ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com