कोरोना मृत्युपैकी ५१२ आजारपणाने दगावले 

corona virus total death
corona virus total death

जळगाव : जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधीत होऊन मृत्यू झालेल्यांची संख्या १ हजार ११४ एवढी आहे. त्यापैकी ९७४ मृत्यू हे ५० पेक्षा जास्त वयोगटातील आहेत. त्यातही ५१२ मृत्यू हे अगोदर विविध आजारपण असलेले, मात्र लवकर रुग्णालयात कोरोनाच्या औषधोपचारासाठी दाखल न झालेले आहेत. जर अगोदरच व्याधी असलेले रुग्ण कोरोनोची लक्षणे दिसताच दाखल झाले असते तर त्यापैकी अनेकांना वाचविण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले असते, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

कोरोना संसर्ग होऊन नये म्हणून तोंडाला मास्क लावणे, वारंवार हात धुणे, गर्दीत जाणे टाळणे. हे सोपे उपचार आहेत. सतत ताप येणे, खोकला येणे, अन्न बेचव लागणे हेही लक्षण कोरोनाची आहेत. ही लक्षणे दिसताच कोरोना टेस्ट करून घेणे, पॉझिटिव्ह आली तर कोरोनोचा औषधोपचार सुरू करणे, निगेटिव्ह आली तर घरी विलगीकरणात राहणे हे पर्याय आहेत. यात विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना ताप, खोकला, सर्दी अंगावर काढण्याची सवय असते. त्यात त्यांना अगोदरच काही व्याधी असेल तर कोरोनोचे विषाणू लागलीच शरीरांतील पेशींवर हल्ला करून आपली प्रतिकार शक्ती कमी करतात. वेळीच जर उपचार घेतले तर विषाणूंचा हल्ला आपण रोखू शकतो. मात्र ज्येष्ठ नागरिक जर उशिरा दाखल झाले तर अगोदरच्या व्याधी, त्यात हा विषाणू यामुळे रुग्णांच्या पेशी यशस्वीरित्या काम करू शकत नाही. यामुळे ज्येष्ठांनी लक्षणे दिसताच लागलीच तपासणी करून औषधोपचार सुरू करणे महत्वाचे आहे. 

पाच हजाराहून अधिक प्रतिबंधीत क्षेत्र
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ५ हजार २२ ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील २ हजार २७९, शहरी भागातील १ हजार २८० तर जळगाव महापालिका क्षेत्रातील १ हजार ४६३ ठिकाणांचा समावेश आहे. या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी ६ हजार २३६ टिम कार्यरत आहे. या क्षेत्रात २ लाख ५४ हजार ४७६ घरांचा समावेश असून यात ११ लाख १० हजार ९१० इतकी लोकसंख्येचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक 
डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली. 

तालुकानिहाय उपचारादरम्यान मृत्यू झालेले रुग्ण असे 
जळगाव शहर- २३५ 
जळगाव ग्रामीण-- ७५ 
भुसावळ-- १२६ 
अमळनेर- ९० 
चोपडा-- ६९ 
पाचोरा-६६ 
भडगाव-४० 
धरणगाव--४६ 
यावल-- ५३ 
एरंडोल--४४ 
जामनेर-- ६७ 
रावेर-- ८३ 
पारोळा--१७ 
चाळीसगाव-- ६७ 
मुक्ताईनगर-- २६ 
बोदवड-- १० 

आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ३२ हजार ९४१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. 
कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या 

जळगाव शहर--६८८३ 
जळगाव ग्रामीण-- १४४६ 
भुसावळ--१९१८ 
अमळनेर-- ३१५९ 
चोपडा-- २४९२ 
पाचोरा--१५७९ 
भडगाव-- १५०७ 
धरणगाव-- १५५६ 
यावल-- ११८४ 
एरंडोल--१८७४ 
जामनेर--२४०६ 
रावेर--१३२४ 
पारोळा--१७६८ 
चाळीसगाव--२५७७ 
मुक्ताईनगर--११४४ 
बोदवड-५२६ 
इतर जिल्ह्यातील २२३.

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com