बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या अधिक; मृतांचा आकडा मात्र चिंताजनक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 September 2020

कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून, आज नव्याने ७४२ रूग्‍णांची वाढ झाल्‍यामुळे जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४३ हजार ३०१ वर पोहचली आहे.

जळगाव : कोरोना व्‍हायरसचा वाढता प्रसार कायम असून, आज देखील जिल्‍ह्यात ७४२ नवे कोरोना बाधित आढळून आले आहे. यात जळगाव शहरासह पारोळा तालुक्‍यात अधिक प्रमाण राहिले. तर आजच्या एकूण बाधितांपेक्षा बरे होवून गेलेल्‍यांची संख्या अधिक आहे. सलग दोन दिवसांपासून हे चित्र पाहण्यास मिळत असल्‍याने काहीसा दिलासादायक चित्र असल्‍याचे म्‍हणावे लागणार आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. बाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असून, आज नव्याने ७४२ रूग्‍णांची वाढ झाल्‍यामुळे जिल्‍ह्‍यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ४३ हजार ३०१ वर पोहचली आहे. तर दुसरीकडे आज दिवसभरात ८३३ रूग्‍णांना कोरोनावर मात करत घरी परतले आहेत. यामुळे आतापर्यंत बरे होवून घरी गेलेल्‍यांची संख्या ही ३२ हजार ३३६ आहे. अर्थात सध्या स्‍थितीला जिल्‍ह्‍यातील वेगवेगळ्या कोविड सेंटरमध्ये ९ हजार ८८५ रूग्‍णांवर उपचार सुरू आहेत. 

१९ जणांचा मृत्‍यू
कोरोना व्हायरसची लागण झालेल्‍यांमधून बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. हे चित्र दिलासादायक असले तरी कोरोनामुळे मृत्‍यू होणाऱ्यांचा आकडा चिंता वाढविणारा ठरत आहे. शुक्रवारी (ता.१८) कोरोनामुळे अठरा जणांचा मृत्‍यू झाला होता. तर आज पुन्हा १९ जणांचा मृत्‍यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत एकूण मृत झालेल्‍यांची संख्या ही १ हजार ८० वर पोहचली आहे. रोजच्या वाढत्‍या आकड्यामुळे परिस्‍थिती चिंताजनक झाली आहे.

 

असे आढळले रूग्‍ण
जळगाव शहर ११६, जळगाव ग्रामीण १०, भुसावळ ६०, अमळनेर ५६, चोपडा ५८, पाचोरा १०, भडगाव २, धरणगाव ४३, यावल २१, एरंडोल ७, जामनेर २५, पारोळा ११५, चाळीसगाव ६४, मुक्‍ताईनगर १८, बोदवड २४ आणि इतर जिल्‍ह्‍यातील १० रूग्‍णांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corona virus update dead ratio tens but recover patient more number