esakal | रुग्णसंख्या घटतेय, मृत्यूदर कायम; दिवसभरात ४ मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus update

जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यापासून सातत्याने कोरोना बाधितांची संख्या घटत आहे. आठशे, हजाराच्या आकड्यांत दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या आता दररोज शंभराच्या आत मर्यादित राहत आहे.

रुग्णसंख्या घटतेय, मृत्यूदर कायम; दिवसभरात ४ मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्ह्यातील कोरोना संसर्ग आटोक्यात येत असला आणि रुग्णसंख्या सातत्याने घटत असली तरी मृत्यूदर कायम आहे. दररोज आढळणाऱ्या रुग्णांचा आलेख खाली आला असूनही मृत्यूदर दोन टक्क्यांवरच कायम असून ही बाब आरोग्य यंत्रणेसाठी चिंताजनक आहे. 
जळगाव जिल्ह्यात दीड महिन्यापासून सातत्याने कोरोना बाधितांची संख्या घटत आहे. आठशे, हजाराच्या आकड्यांत दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या आता दररोज शंभराच्या आत मर्यादित राहत आहे. परिणामी, ॲक्टिव रुग्णही नऊशेच्या आत आले असून रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांपर्यंत पोचला आहे. शुक्रवारी प्राप्त अहवालात नवे केवळ ५३ रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या ५३ हजार १४९ झाली. तर १३४ रुग्ण बरे झाल्याने बरे झालेल्यांचा एकूण आकडा ५१ हजारांपर्यंत पोचला आहे. 

मृत्‍यूचा दर कायम
जिल्ह्यात रोजच्या कोरोना मृत्यूचे सत्र सुरुच आहे. शुक्रवारीही ४३ वर्षीय युवकासह चौघा रुग्णांचा बळी गेल्याने एकूण बळींची संख्या १ हजार २६५ झाली आहे. हे प्रमाण २.३८ टक्के असून ते महिनाभरापासून कायम आहे. रूग्‍ण संख्या घटत असली तरी कोरोनामुळे मृत्‍यू होण्याचा आलेख अद्याप खाली आलेला नाही.

असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर १८, जळगाव ग्रामीण २, भुसावळ ४, अमळनेर ८, चोपडा २, भडगाव ४, एरंडोल १, पाारेळा ४, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर २, बोदवड २. 


 

loading image