बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक; मृतांची संख्या वाढवतेय चिंता

बाधितांपेक्षा बरे होणारे अधिक; मृतांची संख्या वाढवतेय चिंता
corona virus update
corona virus updatecorona virus update

जळगाव : जिल्‍ह्‍यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव स्‍थिरावला असून, काहीसा दिलासा आहे. मात्र हा दिलासा मिळत असल्‍याने नागरीकांमध्ये गाफिलता वाढते आणि संसर्ग पुन्हा वाढल्‍याचे पाहण्यास मिळते. आज दिवसभरात जिल्‍ह्‍यात आढळून आलेल्‍या नवीन बाधितांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र मृतांचा आकडा चिंताजनक आहे.

जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या कोरोना अहवालानुसार जिल्‍ह्‍यात आज दिवसभरात ८५८ नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळून आले. तर १००५ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच्या बाधितांमध्ये जळगाव शहरासह भुसावळ आणि चाळीसगाव तालुक्यात संसर्ग वाढलेला दिसून येत आहे.

साडेनऊ हजार ॲक्‍टिव रूग्‍ण

जिल्ह्यात आज ८५८ कोरोना बाधित आढळून आले असून आतापर्यंत एकुण १ लाख २७ हजार ३११ बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख १५ हजार ४५४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर सद्यस्‍थितीत ९ हजार ५४९ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.

१६ जणांचा मृत्‍यू

कोरोना बाधितांचा आकडा कमी होत आहे. तर बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र कोरोना रूग्‍णांचा मृत्‍यू ही जिल्‍ह्‍यासाठी चिंताजनक बाब आहे. कारण मृत्‍यूचा आकडा अजून देखील कमी होत नसून आजच्या अहवालानुसार दिवसभरात १६ बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

असे आढळले रूग्‍ण

जळगाव शहर १३४, जळगाव ग्रामीण ३५, भुसावळ १२०, अमळनेर २५, चोपडा ४१, पाचोरा ७५, भडगाव ९, धरणगाव २२, यावल ३२, एरंडोल २३, जामनेर ५९, रावेर ३२, पारोळा २३, चाळीसगाव १०७, मुक्ताईनगर ६५, बोदवड ४७ आणि इतर जिल्ह्यातील ९ असे एकुण ८५८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com