corona update जळगाव जिल्ह्यात एकाच दिवसांत १५ जणांचा बळी 

coronavirus update
coronavirus update

जळगाव : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण काही केल्या कमी होताना दिसत नाही. तर दुसरीकडे मृत्यूचे सत्रही थांबायला तयार नाही. दिवसभरात नव्या ३४५ बाधितांसह गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १५ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे बाधितांचा एकूण आकडा साडेबारा हजारांपर्यंत पोचत आहे. 
जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे. दररोज दोन-तीनशेच्या घरात रुग्ण आढळून येत असून आज पुन्हा नव्या बाधितांनी त्रिशतक गाठले. आजच्या ३४५ नव्या रुग्णांसह एकूण रुग्णसंख्या १२ हजार ३८१ झाली असून गेल्या २४ तासांत २२४ रुग्ण बरेही झाले आहेत. एकूण बरे झालेल्यांची संख्याही ८ हजार ६९३ झाली आहे. तर जिल्ह्यात आणखी १५ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. त्यातील पाच रुग्ण एकट्या जळगाव शहरातील आहेत. मृत्यू झालेले सर्व रुग्ण पन्नाशीच्या वरील वयोगटातील आहेत. 
दुसरीकडे ग्रामीण भागातही कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. भडगाव, अमळनेर, चोपडा, जामनेर, एरंडोल यासारख्या ठिकाणी रुग्ण वाढतच आहेत. गेल्या दिवसभरात भडगावमध्ये तब्बल ७७ रुग्ण आढळून आले. तर जळगाव शहरातील आकडा ५० आहे. 
 
असे आढळले रुग्ण 
जळगाव शहर ५०, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ ९, अमळनेर ३१, चोपडा २२, पाचोरा ४४, भडगाव ७७, धरणगाव १७, यावल ३, जामनेर २९, रावेर ७, पारोळा १५, चाळीसगाव १४, मुक्ताईनगर १४. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com