
जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या दीड महिन्यांपासून घटत आहे. रुग्ण कमी व बरे होणारे अधिक ही स्थिती गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे.
जळगाव : दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा घटत आहे. यामुळे जिल्ह्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या आता चारशेच्या घरात पोहचली आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या ५३ हजारांवर गेली असली तरी ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा कमी झाला आहे.
जळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या गेल्या दीड महिन्यांपासून घटत आहे. रुग्ण कमी व बरे होणारे अधिक ही स्थिती गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. जिल्ह्यात आज २७ रुग्ण आढळून आल्यानंतर एकूण संख्या ५३ हजार ७५७ झाली, तर ३९ रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांचा आकडाही ५२ हजार ७२ वर पोचला आहे. यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ९६.८७ टक्क्यांवर गेला आहे.
ॲक्टिव रूग्ण घटले
जिल्ह्यात आजच्या स्थितीला केवळ ४१० रुग्ण ॲक्टिव्ह असून, त्यापैकी २६९ लक्षणे नसलेले तर केवळ १४१ रुग्णांना लक्षणे आहेत. यात चांगली बाब म्हणून जिल्ह्यातील तब्बल बारा तालुक्यांमध्ये एक देखील रूग्ण आढळून आला नाही. तर एका देखील रूग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद गेल्या २४ तासात झालेली नाही.
असे आढळले रुग्ण
जळगाव शहर १०, भुसावळ ४, अमळनेर ९, पारोळा ४