शहरातील 12 फळविक्रेते अटकेत.. काय आहे कारण वाचा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 मे 2020

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान बुधवारी राजकमल चौकात अतिक्रमित वाहनांवर कारवाई करताना पालिका कर्मचारी दीपक चंद्रकांत कोळी यांच्यावर 30 ते 35 फळविक्रेत्यांनी दगडफेक करत हल्ला केला होता.

जळगाव : शहरातील राजकमल चौक परिसरात बुधवारी (ता. 27) अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करीत असताना 30 ते 35 फळविक्रेत्यांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यावर प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात कर्मचारी गंभीर जखमी झाला. याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी आज 12 फळविक्रेत्यांना अटक केली आहे. 
महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेदरम्यान बुधवारी राजकमल चौकात अतिक्रमित वाहनांवर कारवाई करताना पालिका कर्मचारी दीपक चंद्रकांत कोळी यांच्यावर 30 ते 35 फळविक्रेत्यांनी दगडफेक करत हल्ला केला होता. यात कर्मचारी दीपक कोळी गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक व्ही. डी. ससे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील यांच्या पथकाने अटक सत्र राबविले. 

...या फळविक्रेत्यांना अटक 
संशयित फळविक्रेते मोहम्मद रेहान मोहम्मद आजम बागवान (वय 21), मोहम्मद युसूफ मोहम्मद शकील बागवान (वय 32), मोहम्मद शकील मोहम्मद अब्दुल बागवान (वय 57), मोहम्मद सईद मोहम्मद शकील बागवान (वय 30), मोहम्मद ताहेर मोहम्मद याकूब बागवान (वय 29), मोहम्मद मुज्मील अब्दुल अझीझ बागवान (वय 26, सर्व रा. बागवान मोहल्ला, जोशी पेठ), मोहम्मद रियाज हाजी युसूफ बागवान (वय 39), मोहम्मद दानिश मोहम्मद नासिर (वय 23, दोन्हा रा. भवानी पेठ), मोहम्मद सलीम अब्दुल रहेमान बागवान (वय 49, रा. शाहूनगर), मोहम्मद मोहसीन उर्फ अशपाक शेख इस्माईल बागवान (वय 28, रा. रथगल्ली जोशी पेठ), शाहरुख मोहम्मद सलीम (वय 22), मोहम्मद शोएब सईद बागवान (वय 25 रा. भंगारगल्ली, जोशी पेठ) यांना अटक केली आहे. सर्वांवर सरकारी कामात अडथळा, लॉकडाउनचे उल्लंघन, जमावबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon corporation atikraman staff attack matter fruit vyapari arrest