अखेर निर्णय झाला : जळगावातील दुकाने या वेळेत राहणार खुले   

phule market
phule market

जळगाव : जवळपास 75 दिवसांच्या कालावधीनंतर शहरातील दुकाने शुक्रवारपासून (ता.5) अटी-शर्तींसह सुरु करण्याला महापालिका आयुक्तांनी मान्यता दिली आहे. दुकाने सुरु करण्यासाठी सम-विषम तारखांचा निकष घालून देताना व्यापारी संकुले व मॉल्स मात्र बंदच राहतील, असे आदेश काढण्यात आले आहे. शिवाय, दुकानांमध्ये गर्दी होऊ नये, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन याची काळजी दुकानचालकांनाच घ्यावी लागणार आहे. 
कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर 24 मार्चपासून देशव्यापी लॉकडाऊन सुरु आहे. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात देशभरात विविध सवलती देऊन, अटी-शर्तींवर काही व्यवसाय सुरु करण्यासंबंधी निर्देश देण्यात आले. तथापि, जळगाव जिल्ह्यात मात्र लॉकडाऊन सुरुच होते. अत्यावश्‍यक सेवा, जीवनावश्‍यक वस्तूंच्या दुकानांव्यतिरिक्त सर्व व्यवहार गेल्या 75 दिवसांपासून बंद आहेत. जिल्ह्यात 1 जूनपासून काही तालुके, शहरांमध्ये व्यवहार सुरळीत झाले होते, मात्र जळगाव महापालिका हद्दीत संचारबंदी कायम होती. 

.. अखेर मनपा आयुक्तांचे आदेश 
शहरातील दुकाने सुरु करण्यासंबंधी महापालिका आयुक्तांनी स्थितीचा आढावा घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार आयुक्त सतीश कुळकर्णी यांनी आज यासंबंधी आदेश काढलेत. त्यानुसार मनपा, शासकीय, निमशासकीय, खासगी व्यापारी संकुले, मॉल्स वगळता अन्य दुकानांना अटी-शर्तींसह व्यवसाय सुरु करण्यासंबंधी परवानगी देण्यात आली आहे. 
 
असे आहेत निकष 
- दुकाने सम-विषम तारखांनुसार आळीपाळीने सुरु ठेवता येतील 
- एका बाजूची दुकाने सम तारखेच्या दिवशी तर दुसऱ्या बाजूची विषम तारखेला सुरु ठेवावी 
- रस्ता पूर्व-पश्‍मिच असल्यास दक्षिण बाजूकडील दुकाने सम तारखेस व उत्तर बाजूकडील दुकाने विषम तारखेस 
- रस्ता दक्षिण-उत्तर असल्यास पूर्वेकडील दुकाने सम तारखेस, पश्‍चिमेकडील दुकाने विषम तारखेस खुली राहतील 
- व्यापारी संकुले, मॉल्समधील दुकाने बंद राहतील 
- संकुलातील अत्यावश्‍यक सेवा, जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने पूर्वीप्रमाणे सुरु ठेवता येतील 
 
हे नियम पाळावे लागतील 
- दुकानांची वेळ सकाळी 9 ते सायं. 5 अशी राहील 
- कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रुम बंद ठेवावी 
- वस्तू बदलवणे, परत करण्याचे धोरण नको 
- फिजिकल डिस्टन्सिंगची जबाबदारी दुकानदारांवर असेल 
- ग्राहकांसाठी फूट मार्किंग, टोकन पद्धती, घरपोच सेवा उपलब्ध करावी 
- ग्राहकांनी जवळच्या मार्केटचा वापर करावा 
- खरेदीसाठी दुकानापर्यंत पायी जावे, वाहनाचा वापर नको 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com