esakal | खासगी कोविड हॉस्पिटल गाशा गुंडाळण्याच्या स्थितीत 
sakal

बोलून बातमी शोधा

covid private hospital

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना त्यानुसार शासकीय आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडतोय. गेल्या दोन महिन्यांत तर ही स्थिती हाताबाहेर गेली. मात्र, शासकीय आरोग्य यंत्रणेच्या मदतीला खासगी वैद्यकीय यंत्रणा धावून आली.

खासगी कोविड हॉस्पिटल गाशा गुंडाळण्याच्या स्थितीत 

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : कोरोनाग्रस्तांवरील उपचारावर अवाजवी शुल्क आकारण्याला चाप लावताना शासनाने खासगी कोविड हॉस्पिटलसाठी विविध प्रकारचे दर निश्‍चित करून दिले आहेत. मात्र, हे दर परवडणारे नाही. शिवाय, ऑडिटवरून कारवाईचा बडगा उगारला जात असल्याने काही खासगी कोविड सेंटरनी गाशा गुंडाळायला सुरवात केली आहे. शासनाने निश्‍चित करून दिलेले दर मात्र योग्यच असल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला आहे. 
कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना त्यानुसार शासकीय आरोग्य यंत्रणेवर कमालीचा ताण पडतोय. गेल्या दोन महिन्यांत तर ही स्थिती हाताबाहेर गेली. मात्र, शासकीय आरोग्य यंत्रणेच्या मदतीला खासगी वैद्यकीय यंत्रणा धावून आली. खासगी कोविड हॉस्पिटलला परवानगी मिळू लागल्यानंतर राज्यभरात मोठ्या प्रमाणात ते सुरू झाले. मात्र, या खासगी हॉस्पिटलने रुग्णांकडून मोठ्या प्रमाणात शुल्क आकारणे सुरू केले. काहींनी तर ‘धंदा’च सुरू केला. लाखोंच्या घरातील या खर्चाबाबत शासनाकडे तक्रारी येऊ लागल्यानंतर शासनाने कोरोनावरील उपचारासाठी विविध दर निश्‍चित केले. 

प्रशासनाचे आदेश 
शासनाने हे दर निश्‍चित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासंबंधी आदेश काढून कोरोना उपचाराची परवानगी दिलेल्या सर्व खासगी हॉस्पिटल्सना खर्चाचे नियंत्रण घालून दिले. शिवाय, जास्त खर्च आकारण्याच्या तक्रारींमुळे ऑडिट कमिटीही नेमली. या समितीकडेही तक्रारी येऊ लागल्यानंतर काही हॉस्पिटल्सना अतिरिक्त आकारलेले पैसे परत करण्याचे आदेश झाले. 

गाशा गुंडाळण्याचा पवित्रा 
जिल्ह्यात प्रशासनाने अशा १७ खासगी हॉस्पिटल्सना परवानगी दिली होती. त्यापैकी तीन हॉस्पिटल्सनी परवाना मागे घेतला असून, आपला गाशा गुंडाळला आहे. आणखीही काही खासगी हॉस्पिटल्स गाशा गुंडाळण्याच्या स्थितीत आहेत. एकीकडे मेडिसीन, ऑक्सिजन सिलिंडरचे दर वाढलेले, डॉक्टर, नर्सिंग व अन्य कर्माचाऱ्यांच्या वेतनातील वाढ, निश्‍चित केलेले न परवडणारे दर, व्हिजिट फी घेण्यासही बंदी असल्याने अशा स्थितीत कोविड हॉस्पिटल चालविणे कठीण जात असल्याचे मत काही डॉक्टरांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. 
 
‘अंडरटेबल’ आकारणी सुरूच 
शासनाचे निर्बंध व प्रशासनाच्या आदेशान्वये काही खासगी हॉस्पिटल्स निश्‍चित केलेल्या दरानुसार प्रामाणिकपणे काम करीत आहेत. मात्र, काही हॉस्पिटल्स अवाजवी दर आकारून ‘अंडरटेबल’ पैसा घेत असल्याचे प्रकारही समोर येऊ लागले आहेत. 

निश्‍चित केलेले दर 
पॅकेज------------- प्रतिदिन दर 
अलगीकरण व -------४००० 
जनरल वॉर्ड 
आयसीयू ------------७५०० 
(व्हेंटिलेटरशिवाय) 
आयसीयू-------------९००० 
(व्हेंटिलेटरसह) 

संपादन ः राजेश सोनवणे

loading image
go to top