जिल्ह्यात "कोरोना' रुग्णसंख्या तीन हजार पार 

corona
corona

जळगाव : जिल्ह्यात "कोरोना'चा विस्फोट झाला असून, दररोज रुग्णसंख्या वाढतच आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात "कोरोना'चे 111 नवे रुग्ण आढळून आल्याने बाधितांची संख्या तीन हजारांवर पोहोचून 3082 झाली आहे. गेल्या चोवीस तासांत 73 जण बरे झाले; तर 7 जणांचा मृत्यू झाला. 
देशासह राज्यात "कोरोना'चा कहर दिवसेंदिवस वाढतच असून, रोज हजारोंच्या संख्येने रुग्ण आढळून येत असल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यातही अशीच भयावह परस्थिती निर्माण झाली असून, या ठिकाणी रोज शेकडो रुग्ण बाधित होत आहेत. आज दिवसभरात जिल्ह्यात "कोरोना'चे 111 नवे रुग्ण आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 3082 झाली असल्याने आज जिल्ह्यात "कोरोना'बाधितांनी तीन हजारांचा टप्पा पार केला आहे. 

मृतांची संख्या 221 वर 
जिल्ह्यातील "कोरोना'बाधित बरे होणाऱ्यांचे प्रमाण राज्यात अव्वल आहे. मात्र, जिल्ह्यातील मृत्यूदर आटोक्‍यात येत नसल्याने रोज "कोरोना'मुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण पूर्वीइतकेच आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात सात जणांचा "कोरोना'मुळे मृत्यू झाला असून, मृत्यूंची संख्या 221 झाली आहे. यामध्ये आज चोपडा तालुक्‍यातील 75 वर्षीय महिला, भुसावळ तालुक्‍यातील 35 वर्षीय महिला, एरंडोल तालुक्‍यातील 67 वर्षीय पुरुष, धरणगाव तालुक्‍यातील 65 वर्षीय पुरुष, पारोळा तालुक्‍यातील 87 वर्षीय पुरुष, तर रावेर तालुक्‍यातील 48 व 83 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

बरे झालेल्यांची संख्या अधिक 
एकीकडे दररोज "कोरोना'बाधितांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. आज दिवसभरात 73 रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत 1839 रुग्ण बरे झाले. यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात सर्वाधिक आहे. 

असे आढळले रुग्ण 
आज जळगाव शहर- 55, जळगाव ग्रामीण- 8, भुसावळ- 17, धरणगाव- 6, यावल- 3, एरंडोल- 8, जामनेर- 3, रावेर- 4, बोदवड- 4 यासह पारोळा, पाचोरा व चोपडा या ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. 

एकाच घरातील दहा जण बाधित 
जळगाव शहरात आज "कोरोना'चे नवे 55 रुग्ण बाधित आढळले. यामध्ये शहरातील चौघुले प्लॉट परिसरात गेल्या दोन दिवसांआधी एकाच घरातील 5 जणांचे अहवाल "पॉझिटिव्ह' आले. त्यानंतर आज पुन्हा त्याच घरातील पाच जणांचे अहवाल "पॉझिटिव्ह' आल्याने एकाच कुटुंबातील 10 जण बाधित आढळले. तसेच आज शिवाजी अजिंठा लॉन्स- 2, शिवाजीनगर- 4, जोशीवाडा- 5, शिवकॉलनी- 2, जळगाव खुर्द- 3 यासह उस्मानिया पार्क, गणपतीनगर, खंडेरावनगर, रेणुकानगर, शनिपेठ, आदर्शनगर, विवेकानंदनगर, मोहननगर, राधाकृष्ण कॉलनी, हरिविठ्ठलनगर 2, सेंट्रल बॅंक कॉलनी, कोळीपेठ, शाहूनगर, सुप्रिम कॉलनी, रामेश्वर कॉलनी, नवीपेठ, इच्छादेवी चौक यासह इतर भागांत पाच जण बाधित आढळून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com