नवीन दाखल होणाऱ्या कैद्यांसाठी कारागृहातच अलगीकरण

jalgaon jail
jalgaon jail

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रोज कारागृहात नवीन दाखल होणाऱ्या नवीन कैद्यांना (बंद्यांना) अलगीकरण करण्यासाठी जळगाव जिल्हा कारागृहाच्या आवारातील कलाभवन, कारागृह न्यायालय हॉल हे ठिकाण पुढील आदेश होईपावेतो तात्पुरते कारागृह म्हणून जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी घोषित केले आहे. 

अवश्‍य वाचा- भुसावळ जंक्‍शनवर महिनाभरापासून काय घडतेय जरा पहा...

दरम्यान, सद्यःस्थितीत कारागृहात असलेल्या कैद्यांची कोरोना चाचणी करून घेण्याचेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. जिल्हा कारागृहाच्या अधीक्षकांनी कारागृहात नवीन दाखल होणाऱ्या नवीन बंद्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी त्यांची व्यवस्था वरील ठिकाणी करावी. नवीन दाखल होणाऱ्या बंद्यांची जिल्हा शल्यचिकित्सकांकडून कोरोना चाचणी करून घ्यावी. या ठिकाणी आवश्यकतेनुसार कारागृहातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. सद्यःस्थितीत कारागृहात उपलब्ध असणाऱ्या सर्व बंद्यांची कोरोनाची चाचणी करून घ्यावी. त्यासाठी महापालिका आयुक्तांनी व जिल्हा शल्यचिकित्सकांशी समन्वय साधून आवश्यक ते सहकार्य प्राप्त करून घ्यावे. 
 
कलाभवनात बंदोबस्त द्यावा 
जिल्हा पोलिस अधीक्षकांनी जिल्हा कारागृहात तात्पुरते कारागृह म्हणून घोषित केलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने उपलब्ध असलेले पोलिस कर्मचारी, होमगार्डस यांची तात्पुरत्या स्वरूपात बंदोबस्तासाठी नेमणूक करावी, असे आदेशात म्हटले आहे. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com