esakal | जळगाव जिल्हात राष्ट्रवादीत चिंता वाढली; खडसे पाठोपाठ मलिक, देसले कोरोनाबाधित
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्हात राष्ट्रवादीत चिंता वाढली; खडसे पाठोपाठ मलिक, देसले कोरोनाबाधित

जयंत पाटील यांच्या संवाद यात्रेने जिल्हा राष्ट्रवादीत कोरोनाची जत्राच भरवल्याचे चित्र आहे..

जळगाव जिल्हात राष्ट्रवादीत चिंता वाढली; खडसे पाठोपाठ मलिक, देसले कोरोनाबाधित

sakal_logo
By
सचिन जोशी

जळगाव : प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, एकनाथ खडसे कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर आता जिल्हा राष्ट्रवादीतील आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील आदींनी विलगीकरण स्वीकारले आहे. तर गफ्फार मलिक, योगेश देसलेही कोरोनाग्रस्त झाले आहेत. 


जयंत पाटील यांच्या संवाद यात्रेने जिल्हा राष्ट्रवादीत कोरोनाची जत्राच भरवल्याचे चित्र आहे. खानदेशात या यात्रेचा समारोप झाल्यानंतर जयंत पाटील यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यापाठोपाठ एकनाथ खडसेही बाधित आढळून आले. त्यांच्या स्नूषा खासदार रक्षा खडसेही बाधित झाल्या आहेत. 

आणखी पदाधिकारी बाधित 

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्याकडे भोजन घेतले होते. त्यामुळे गुरुवारीच अभिषेक यांच्या पत्नी बाधित आढळून आल्या. शुक्रवारी युवक राष्ट्रवादीचे योगेश देसले व रात्री गफ्फार मलिक यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मलिक यांचा गुरुवारी (ता. १८) नागरी सत्कार झाला. त्यात मोठी गर्दी झाली होती. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी विलगीकरण स्वीकारले आहे. एकूणच संवाद यात्रेने राष्ट्रवादीत कोरोनाचा संसर्ग पसरविल्याचे बोलले जात आहे. 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top