खरिप कर्ज वाटपात जिल्हा बँक अव्वल...मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्यास केले ‘हाथ वर’

खरिप कर्ज वाटपात जिल्हा बँक अव्वल...मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज देण्यास केले ‘हाथ वर’

जळगाव ः जिल्ह्यात कोरोना संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. शासन शेतकऱ्यांना विविध प्रकारे मदत करीत आहे. जिल्हा बँकेने आतापर्यंत १ लाख ७५ हजार सभासदांना ५५० कोटींचे कर्ज वाटप करून कोरोना काळातही जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या मदतीला असल्याचे दाखवून दिले आहे. 

मार्चपासून कोरोना संसर्गाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच आहे. अशा स्थितीत खरिपाचा हंगाम जूनपासून सूरू झाला. जुनपूर्वीच काही शेतकऱ्ायंना महात्मा ज्योतीबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळाल्याने ते कर्जमुक्त झाले होते. कर्जमुक्त झालेल्या व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोना काळातही पिक कर्ज वाटप केले. या-ना त्या कारणाने कर्ज देण्यासाठी फिरवाफिरव केली नाही. 

याउलट राष्ट्रीयकृत बँकांची स्थिती आहे. खरिपाचे पिक कजर् देण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकासह ग्रामीण बँका व खासगी बँकांचा हात आखडता आहे. राष्ट्रीयकृत बँकांना केंद्र व राज्य शासन मदतीचा हात देवून, कर्ज बुडव्यांचेही कर्ज माफ करते. असे असताना शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी राष्ट्रीयकृत बँकांचे उंबरठे झिझवावे लागतात. तरीही कर्ज मिळत नाही. 

जळगाव जिल्ह्यातही तसा प्रकार घडलेला आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी केवळ ४ हजार ३३५ शेतकऱ्यांना ६९ कोटींचे दिले. तर ग्रामीण व खासगी बँकांनी १६ कोटींचे कर्ज दिले आहे. 

जिल्हाधिकारी अभिजित राउत व लीड बँकेच्या अध्यक्षांनी शेतकऱ्यांना कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाईची मागणी शेतकरी करीत आहे. 
 

बॅंकेचे नाव---कर्ज वाटप झालेले सभासद- 
जिल्हा बँक--१ लाख ७५ हजार--५५० कोटी 
राष्ट्रीयकृत बँक--४ हजार ३३५--६९ कोटी लाख 
ग्रामीण बँक--१६१--१ कोटी ८० लाख 
खासगी बँक--१५०५----१५ कोटी १५ लाख 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com