अटी शर्तीवर काही दुकान, कार्यालयांना उघडण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

अटी शर्तीवर काही दुकान, कार्यालयांना उघडण्याची जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

जळगाव  ः ऑप्टीकल दुकाने, अभ्यासिका, खाजगी वाहतुक कार्यालये, सी.ए.कार्यालये सुरू ठेवण्यास निर्बंधातून सुट जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिली आहे. यामुळे आता वरील कार्यालये सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरू राहतील. 

कोविडवर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी ५ एप्रिलच्या आदेशानुसार जिल्ह्यासाठी विशेष निर्बध लागू होते. या निर्बधांतून खालील बाबींना काही अटींवर सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी निर्गमित केले आहे. 

ऑप्टीकल दुकाने

ऑप्टीकल दुकाने हे केवळ सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येतील. या दुकानात काम करणारे कर्मचाऱ्यांना (४५ वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे. कोविड लसीकरण न केल्यास १० एप्रिलपासून कोविड-१९ आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह ‍रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील. 

परवानगी घ्यावी लागणार

महापालिका क्षेत्रात शासकीय व खाजगी रुग्णालयास चादरी, बेडशिट, इतर साहित्याचा पुरवठा करणाऱ्या दुकानांना गृह शाखा, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून व जळगाव शहर मनपा क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्रात संबंधित तहसिलदार यांच्यामार्फत आवश्यकतेनुसार दिनांकास ठराविक वेळेकरीता दुकान उघडे ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. तथापि अशी दुकाने सुरु करतांना संबंधित दुकान चालकांना संबंधित रुग्णालयाकडून पुरवठा करण्याबाबतची लेखी मागणी सादर करावी लागेल. अशा दुकानदारांना परवानगी घेतल्यानंतर मागणी केलेले सहित्य काढून दिल्यानंतर लगेच दुकान बंद करावे लागेल. 

अभ्यासिका अटी शर्तिवर

अभ्यासिका (लायब्ररी, वाचनालये) यांना केवळ ५०% क्षमतेच्या मर्यादेत फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येतील. खाजगी प्रवाशी वाहतुक कार्यालयोनाीर फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येतील. 

हाॅफीस, कार्यालये सुर करण्याचे आदेश

इतर खाजगी कार्यालयामध्ये फायनान्शीअल मार्केट, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, ऑल नॉन बॅकीग फायनान्शीअल कार्पोरेशन्स यांना शासनानक सुट दिली आहे. मुळे चाटॅर्ड अकाऊंटन्ट यांना त्यांची कार्यालये फक्त सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत सुरु ठेवता येतील. त्यांनी कार्यालयामध्ये प्रत्यक्ष संबंधीत नागरीकांना प्रवेश न देता त्यांना ईमेलव्दारे अथवा दूरध्वनीव्दारे आवश्यक असलेल्या कागदपत्राची मागणी करण्यात यावी. 

आरटीपीसीआर चाचणी आवश्य

ज्या दुकानांना, आस्थापनाना परवानगी देण्यात आली आहे त्यातील सर्व कामगार, अभ्यासिकेमध्ये काम करणारे कर्मचारी, अभ्यास करणारे विद्यार्थी यांनी (४५ वर्ष वय) कोविड लसीकरण करुन घ्यावे. कोविड लसीकरण न केल्यास १० एप्रिलपासून कोविड-१९ आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह ‍रिपोर्ट सोबत बाळगणे अनिवार्य राहील.

संपादन-  भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com