जळगावः नियमित नव्या रुग्णांमुळे कोरोनामुक्तीत अडचण

सक्रिय रुग्णसंख्याही बऱ्यापैकी घटली. मात्र, एक-दोनच्या संख्येत दररोज अथवा दिवसाआड नवे रुग्ण आढळून येत आहे.
Corona
Corona


जळगाव : जिल्ह्यात एक-दोनच्या संख्येने सातत्याने नवे रुग्ण (Paitent) आढळून येत असल्यामुळे जिल्हा कोरोनामुक्त (Corona Free) होण्यात मोठी अडचण निर्माण झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून संसर्ग नियंत्रणात असला तरी किरकोळ संख्येने रुग्ण समोर येत असल्याने अद्याप सक्रिय रुग्णसंख्या शून्यावर पोचू शकलेली नाही.

Corona
जळगावः जिल्ह्यात २२४ रेशन दुकाने सुरू होणार


जळगाव जिल्ह्यात जून, जुलैपासून कोरोनाचा संसर्ग दुसऱ्या लाटेच्या तीव्रतेतून कमी होऊ लागला. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये हा आलेख बराच खाली घसरला. दररोज आढळून येणाऱ्या नव्या रुग्णांची संख्याही दोन-तीनच्या संख्येत असल्याने सक्रिय रुग्णसंख्याही बऱ्यापैकी घटली. मात्र, एक-दोनच्या संख्येत दररोज अथवा दिवसाआड नवे रुग्ण आढळून येत असल्याने जिल्हा अद्याप कोरोनामुक्त होऊ शकलेला नाही.

Corona
गिरीश महाजनांना पैशांचा घमेंड,फोडाफोडीचे करतात राजकारण-रोहित पवार


शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार भुसावळ तालुक्यात दोन नवे रुग्ण समोर आले. तर दिवसभरात एकही रुग्ण कोरोनामुक्त झाला नाही. त्यामुळे आज सक्रिय रुग्णांची संख्या १६वर पोचली. जळगाव शहरात व भुसावळमध्येच अनुक्रमे ६ व ५ सक्रिय रुग्ण आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com