दिलासादायक..जळगाव जिल्ह्यात दिवसभरात एकच रुग्णाचा मृत्यू !

दुसऱ्या लाटेत प्रथमच सक्रिय रुग्णांची संख्या घटून तीन हजारांच्या आत आली आहे
corona
coronacorona


जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) संसर्ग आटोक्यात येत असताना, आता रोजच्या मृत्यूसंख्येतही (Death) मोठी घट झाली आहे. सोमवारी (ता. ७) जिल्ह्यात एकच रुग्णाच्या मृत्यूची नोंद आहे. याआधी २१ फेब्रुवारीस अशा प्रकारे दिवसभरातील एकच मृत्यू नोंदविला गेला होता. त्यानंतर तब्बल १०७ दिवसांनी अशी नोंद झाली.

(jalgaon district corona patient numbers low)

corona
ठाकरे सरकारला मराठा आरक्षण द्यायचेच नाही


जळगाव जिल्ह्यात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासूनच कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे. मे महिन्यात तो बऱ्यापैकी आटोक्यात आला आणि आता जूनच्या पहिल्या दिवसापासूनही तो नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १०२ नवे रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख ४० हजार ९९४व र पोचली, तर ३१२ रुग्ण बरे झाल्यामुळे बरे होणाऱ्यांचा आकडा वाढून एक लाख ३५ हजार ६०१ वर पोचला आहे. दुसऱ्या लाटेत प्रथमच सक्रिय रुग्णांची संख्या घटून तीन हजारांच्या आत आली आहे. असे असले तरी सोमवारी अवघ्या साडेचार हजारांवर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट दोन टक्क्यांवर आहे.

एरंडोल, चाळीसगावला चिंता
जळगाव शहरासह जिल्ह्यातील १३ तालुक्यांमध्ये सोमवारी नोंदल्या गेलेल्या रुग्णांची संख्या दहाच्या आत होती. मात्र, चाळीसगाव व एरंडोल येथे जास्त रुग्ण आढळून आले. एरंडोलला ४७, तर चाळीसगाव तालुक्यात २९ बाधित आढळले. जळगाव शहर, चोपडा, भडगाव तालुक्यात प्रत्येकी दोन, अमळनेर, रावेरला प्रत्येकी एक, यावल, पाचोरा व जामनेर तालुक्यात प्रत्येकी चार, तर मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, जळगाव ग्रामीण, या तालुक्यांमध्ये एकही रुग्ण आढळून आला नाही.

corona
गावासह जिल्ह्याला कोरोनामुक्त करण्याचा संकल्प करा !

लसीकरणाची स्थिती
सोमवारी जळगाव जिल्ह्यातील विविध केंद्रांवर राबविलेल्या लसीकरणात दोन हजार ४७२ जणांना पहिला डोस देण्यात आला, तर तीन हजार ८१६ जणांनी लसीचा दुसरा डोस घेतला. आतापर्यंत जिल्ह्यात चार लाख २३ हजार ५२३ जणांनी पहिला डोस घेतला असून, दुसरा डोस पूर्ण केलेल्या लाभार्थींची संख्या एक लाख २८ हजार ८६ आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com