कोरोनाचा कहर सुरूच; 144 नवे पॉझिटीव्ह 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जून 2020

जळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत जात आहे. कोविड रूग्णालयातून सायंकाळी येणाऱ्या अहवालांमधून पॉझिटीव्ह केस येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जिल्ह्यात आता एक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव जळगावकर गांभीर्याने घेत नसल्याने आणि नियमांचे पालन केले जात नसल्याने जिल्ह्यातील कोरोनाचा जोर वाढतच जात आहे. रोज कोरोना बाधितांच्या संख्येत शतकाने वाढ होत असून आज यात आणखी 144 नव्या पॉझिटीव्ह रूग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्याची चिंता अधिकच वाढत चालली आहे. 
जळगाव जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत जात आहे. कोविड रूग्णालयातून सायंकाळी येणाऱ्या अहवालांमधून पॉझिटीव्ह केस येण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे जिल्ह्यात आता एक भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाचा विस्फोट होत असताना नागरीकांकडून खबरदारी घेतली जात नाही. बिनधास्तपणे फिरत असल्याने कोरोना व्हायरस बाधिकांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यात आज जिल्ह्यात 144 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्याने एकूण बाधितांची संख्या ही 3 हजार 582 वर पोहचली आहे. 

दहा जणांचा झाला मृत्यू 
एकीकडे कोरोना बाधितांचा आकडा वाढत असताना कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची देखील संख्या वाढत आहे. दिवसभरात कोरोनाची लागण झालेल्या रूग्णामधून आज दिवसभरात 97 जण बरे होवून घरी परतले आहेत. तर दिवसभरात जिल्ह्यात कोरोनामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यात जामनेर तालुक्‍यात तीन, जळगाव शहर एक, भुसावळ तालुक्‍यात दोन, यावल तालुक्‍यात दोन, धरणगाव व एरंडोल तालुक्‍यात प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला. यामुळे कोरोनामुळे आता मृत्यू झालेल्यांची संख्या 244 वर पोहचली आहे. तर उपचार घेत असलेल्या 1 हजार 228 रूग्णांपैकी 173 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. 

असे आढळले रूग्ण 
जळगाव शहर 24 (752), जळगाव ग्रामीण 5 (119), अमळनेर 2 (319), भुसावळ 1 (419), भडगाव 19 (228), बोदवड 7 (60), चाळीसगाव 4 (44), चोपडा 11 (243), धरणगाव 8 (158), एरंडोल 1 (155), जामनेर 11 (190), मुक्‍ताईनगर 9 (39), पाचोरा 4 (91), पारोळा 8 (223), रावेर 13 (258), यावल 19 (184) 
 
जळगाव शहरात सापडलेले बाधित असे 
कोळी पेठ 6, गेंदालाल मिल 1, विठोबानगर (जुना खेडी रोड) 1, मुक्‍ताईनगर 1, शिवाजीनगर 2, इंद्रप्रस्थनगर 3, शिवकॉलनी 1, उत्तम पार्क (कोल्हे हिल्सजवळ) 1, विद्युत कॉलनी (कोल्हेनगरजवळ) 1, कांचननगर 1, अडावद (चोपडा) 1, उस्मानिया पार्क 2, ओंकारनगर 2, शिवशक्‍ती अपार्टमेंट (महाबळ) 1.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon district corona positive 144 case