आलेले खत जाते कुठे...पुरेशा प्रमाणात खत पण तरीही रांगा

fertilizer
fertilizer

भडगाव : जिल्ह्यात आतापर्यंत खरीप हंगामासाठी जेवढे रासायनिक खते अपेक्षित होते. तेवढे रासायनिक खते जिल्ह्यात उपलध्द झाले आहेत असा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. मग तरीही खत टंचाई कशी काय? असा प्रश्न जिल्ह्यात खतांच्या दुकानावरील रांगा पाहिल्यावर पडतो. त्यामुळे आलेले खत जाते तरी कुठे? हे शोधण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत तब्बल ४८ हजार मेट्रिक टन युरिया, तर १०:२६:२६ हे खत १७ हजार ५१६ टन विक्रेत्यांना वितरित करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. तर आत्तापर्यंत एकूण एक लाख ५८ हजार टन रासायनिक खते विक्रेत्यांना वितरित करण्यात आले आहे. 
जिल्ह्यात यंदा पाऊस वेळेवर येत असल्याने पीक डौलदार आहेत. मात्र खतांसाठी शेतकऱ्यांची मोठी वणवण असल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे. कुठे युरियाची टंचाई तर कुठे १०:२६:२६ मिळत नाहीये. इतर खतांचीही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. अक्षरशः शेतकऱ्यांना खतासाठी दुकानासमोर दिवसभर रांगेत उभे राहण्याची वेळ आली आहे. तर दुसरीकडे मागणीएवढे खते जिल्ह्यात उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. 

५४ हजार टन युरिया वितरित 
कृषी विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार खरीप हंगामात आत्तापर्यंत ४८ हजार ६४३ टन युरिया उपलब्ध झाला आहे. याशिवाय पोटॅश १३७५५ टन, फॉस्फेट ७३४० टन, एस.एस.पी ४८९८२ टन, १०:२६:२६ हे खत १७५१६ टन, १५:१५:१५ खत ६४६३ मेट्रिक टन, १६:१६:१६ हे खत ५५४४ टन खूप विक्रेतांना वितरित झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. असे असताना जिल्ह्यात खतांसाठी शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या आहेत. त्यांना पुरेशा प्रमाणात खत उपलध्द मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. 

मग टंचाई कशी काय? 
एकीकडे आवश्यक तेवढे खत उपलध्द असल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात येतो. तर मग दुसरीकडे खतांची टंचाई कशी काय? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे. दोन दिवसापासून भडगाव येथील शेतकरी सहकारी संघात दिवसभर थांबलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी फक्त दोन गोण्या युरियाच्या भेटल्या. त्यासाठी ते दिवसभर तेथे नंबर लावून होते. खत नसल्यामुळे टंचाई की कृत्रिम टंचाई केली जात आहे? हे शोधण्याचे आव्हान कृषी विभागासमोर आहे. 
 
....म्हणून खत टंचाई 
लॉकडाउनमुळे वॉटर सोल्युबल खतासाठी आवश्यक असणारा कच्चा मालाची परदेशातून आयात न झाल्याने 'त्या' खताचे उत्पादन बंद होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात विशेषतः केळीसाठी वॉटर सोल्युबल खत वापरले जातात. मात्र ही खते उपलध्द न झाल्याने ते शेतकरी ही दाणेदार खतांकडे वळला. त्यामुळे खतांची मागणी वाढली. पर्यायाने खतांची चणचण भासत असल्याचे शेतकरी नेते एस. बी. पाटील यांनी सांगितले. तर अनेक मोठे शेतकरी पुढील मात्रा देण्यासाठी आत्तापासून खतांची साठवणूक करताना दिसत आहे. 
 
खत देता का कोणी खत... 
"घर देता कोणी घर..." या 'नटसम्राट' चित्रपटातील डॉयलाग प्रमाणे शेतकरी सध्या " खत देता कोणी खत.." अशी आर्त हाक मारताना दिसत आहे. मात्र त्याच्या या हाकेला कोणीही थारा देत नसल्याची ग्राउंड रिॲलिटी आहे. यंदा पाऊस मुबलक आहे पण दुसरीकडे वेळेवर खत मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. अनेक ठिकाणी खतांसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहे. याकडे कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी होत आहे. 
 
सद्यःस्थितीला मागणी आणि पुरवठ्यात तफावत असल्याने टंचाई निर्माण झाली आहे. मात्र अशा परिस्थितीत अवघे धरू सुपंथ या प्रमाणे शेतकऱ्यांनी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. तर साठवणूक होणार नाही याकडे कृषी विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. 
- एस. बी. पाटील - समन्वयक शेतकरी कृती समिती 

जिल्ह्यातील खत वितरित दृष्टिक्षेपात ( मेट्रिक टनात) 

- एकूण रासायनिक खत वितरण..१५७९६६ 
- युरिया........४८६४३ 
- पोटॅश ........१३७४४ 
- फास्फेट........७३४० 

- एस.एस.पी...४८९८२ 
- १०:२६:२६....१७५१६ 
- १५:१५:१५....६४६३ 
- एन.पी.के......३९२५७ 

संपादन : राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com