esakal | चांगल्या पावसामुळे ‘मनरेगा’ बेरोजगारांसाठी जीवनदायी
sakal

बोलून बातमी शोधा

MGNREG Scheme

चांगल्या पावसामुळे ‘मनरेगा’ बेरोजगारांसाठी जीवनदायी

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव : कोरोनाकाळात (Corona) ग्रामीण भागातील (Rural part) नागरिकांना हक्काचे काम मिळवून देणारी योजना म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREG Scheme) ठरली होती. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला खरा, मात्र आजही या योजनेत सहा हजार ९२० बेरोजगारांना रोजगाराच्या (Employment) संधी उपलब्ध झाल्या आहेत. पाऊस चांगला (Good Rain) होत असल्याने वृक्षलागवड, फळबाग लागवड अशा कामांवर अधिक मजूर काम करताना दिसतात.

हेही वाचा: जळगाव जिल्हा कारागृहात महिला कैद्याचा आत्महत्याचा प्रयत्न

अनलॉकनंतर संख्या झाली कमी
लॉकडाउनच्या काळात या योजनेंतर्गत सुमारे नऊ हजार १३७ मजुरांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला होता. आता मजूरसंख्येत दोन हजारांनी घट झाली आहे. २०२०-२१ या वर्षात या योजनेंतर्गत ४६९ कोटी ६१ लाख एवढा निधी मजुरीवर खर्च झाला आहे.

कोरोना महामारीच्या संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाउन होता. ग्रामीण भागात परिस्थिती बिकट होती. अशा स्थितीत ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार देत २४८ रुपये रोजंदारी देऊन रोजचा चारितार्थ चालविण्यास महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेने मदत केली होती. यामुळे ग्रामीण भागातील मजुरांचा निर्वाहाचा प्रश्‍न काही अंशी सुटला होता. या योजनेंतर्गत वैयक्तिक व सार्वजनिक कामे करण्यात आली आहेत. त्यात फळबाग लागवड, वृक्षलागवड, शोषखड्डे, घरकुल सिंचन विहीर, रस्ते, नाला खोलीकरण, संरक्षक भिंत अशी कामे करण्यात आली आहेत, तर ५४२ शाळांना अत्याधुनिक प्रकारचे कुंपण बांधले आहे.


हेही वाचा: मुलाचे पार्थिव नेण्यासाठी वृद्ध बाप भिक्षा मागतो तेव्हा..!

‘रोहयो’चे आकडे बोलतात...
सध्या सुरू कामे ः १,२०९
ग्रामपंचायतीची संख्या ः ५०६
मजुरांची संख्या ः ६ हजार ९२०
आजअखेर मनुष्यनिर्मिती दिवस ः १,६३,५५३


पावसाळ्यात सध्या मजूरसंख्या कमी आहे. तरीही सहा हजार ९२० जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यंदा मजुरी २३८ वरून २४८ एवढी झाल्याने मजुरांमध्ये आनंद आहे. वृक्षलागवड, वैयक्तिक शौचालय, फळबाग लागवड, विहीर खोलीकरण, जिल्हा परिषदेच्या शाळांना कंपाउंड अशी कामे सुरू आहेत.
-प्रसाद मते, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना

loading image
go to top