जळगाव जिल्ह्यात १३६ खाजगी हॉस्पिटल्सना..७६० रेमडेसिव्हिरचे वाटप !

प्राप्त साठ्यापैकी दहा टक्के साठा हा फ्रंटलाइन वर्कर्ससाठी राखीव ठेवण्यात येत आहेत.
remdesivir
remdesivir remdesivir

जळगाव : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी आज जिल्ह्यातील १३६ खासगी हॉस्पिटल्सना ७६० रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या व्हायल्सचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

शनिवारी (ता. २४) जिल्ह्याला ७६० रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या व्हायल्स प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील कोविड उपचार करणाऱ्या ११७ खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन बेडच्या संख्येनुसार ३१५ रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या व्हायल्स या महापालिका, पालिका, नगर परिषदा व ग्रामीण क्षेत्रातील हॉस्पिटल्सला वितरित करण्यात आल्या आहेत. तर १९ कोविड हॉस्पिटलला ४३६ व्हायल्स कंपनीकडून घाऊक विक्रेत्यांमार्फत परस्पर वितरण होत आहे. तर प्राप्त साठ्यापैकी दहा टक्के साठा हा फ्रंटलाइन वर्कर्ससाठी राखीव ठेवण्यात येत आहेत.

संबंधित कोविड रुग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करून घेणेकामी रुग्णालयाच्या लेटरहेडवर सही, शिक्क्यासह प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करून घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण सदर आदेशाचे तारखेस मुदतीत व शासकीय, वाजवी दरात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्या मुळे सर्व कोविड हॉस्पिटलमध्ये रुग्णांना थेट साठा उपलब्ध होत आहे.

जळगाव जिल्ह्यातील रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा विचारात घेता सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध कार्यालय येथे २४ तास बाय ७ दिवस रेमडेसिव्हिर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. रेमडेसिव्हिरचा काळा बाजार रोखण्याच्या अनुषंगाने शहरी व ग्रामीण भागात भरारी पथके प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे नियंत्रणाखाली स्थापन करण्यात आली आहेत. त्यांच्यामार्फत रुग्णालये, स्टॉकिस्ट व वितरक यांच्याकडील रेमडेसिव्हिरची उपलब्धता व सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. त्यासोबतच महापालिका, पालिका प्रशासन व नगर पंचायतसह आयुक्त औषध व प्रशासन यांनी प्राधिकृत केलेल्या आरोग्य अधिकारी यांनी नियंत्रण करणेबाबतही सूचना देण्यात आल्या आहेत.

वाटपाची यादी तयार होणार

रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळा बाजार होऊ नये, याकरिता दररोज प्राप्त झालेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप करण्यात येऊन केलेल्या वाटपाची हॉस्पिटलनिहाय रेमडेसिव्हिर इंजेक्शन्सच्या संख्येसह व वितरकाच्या नाव व मोबाईल क्रमांकासह यादी तयार करण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com