जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा एकही मृत्यू नाही

सहा तालुक्यांसाठी सोमवारचा दिवस दिलासादायक ठरला
जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा एकही मृत्यू नाही



जळगाव : जिल्ह्यात रविवारनंतर आज सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी एका मृत्युची नोंद (Death) झाली नाही. जिल्ह्यात नवे ४८ बाधित आढळून आले असून दिवभरात १०१ रुग्ण बरे होऊन कोरोनामुक्त (corona free) झालेत. (jalgaon district second day no corona patient death)

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा एकही मृत्यू नाही
वरखेडे शिवारात पून्हा बिबट्याचा हल्ला; पंधरा दिवसात तिसरी घटना


जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा (corona) संसर्ग नियंत्रणात येत असला तरी गेल्या आठवडाभरापासून दररोज बाधित आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या पन्नासच्या घरात स्थिर आहे. दिलासादायक बाब म्हणून चार महिन्यांनंतर रविवारी एकाही मृत्युची नोंद झाली नाही, तर सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारीही जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

आज ४८ रुग्ण
गेल्या २४ तासांत आणखी ४८ रुग्ण आढळून आले, त्यामुळे एकूण रुग्णसंख्या १लाख ४१ हजार ९८२ झाली आहे. तर १०१ रुग्ण बरे झाल्यानंतर बरे होणाऱ्यांचा आकडा १ लाख ३८ हजार १०२वर पोचला आहे. सोमवारी ४ हजार १४१ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत.

जळगाव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाचा एकही मृत्यू नाही
वादळात जीव गमावलेल्या मृतांच्या वारसांना मिळाली मदत

सहा तालुक्यांत रुग्ण नाही
जळगाव जिल्ह्यातील सहा तालुक्यांसाठी सोमवारचा दिवस दिलासादायक ठरला. भुसावळ, अमळनेर, भडगाव, यावल, जामनेर व बोदवड अशा सहा तालुक्यांत एकाही रुग्णाची नोंद झाली नाही. अन्य तालुक्यातील स्थिती अशी : जळगाव शहर १, जळगाव ग्रामीण ५, चोपडा ७, पाचोरा ४, धरणगाव ३, एरंडोल ३, रावेर १, पारोळा ४, चाळीसगाव १८, मुक्ताईनगर २.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com