जिल्हा प्रशासनाला आले शासनाचे पत्र; दिले १८५ कोटीचे उद्दीष्‍ट

tax revenue
tax revenue

जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या वित्तीय वर्षात राज्याची कर, इतर उत्पन्नात घट होणार आहे. अपेक्षित महसुली घट व त्याचे राज्यातील अर्थव्यवस्थेवर परिणाम झालेले आहेत. ही उणीव भरून काढण्यासाठी यंदा महसूल वसुलीवर भर दिला जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्याला १८५ कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट शासनातर्फे दिले गेले आहे. नूकतेच जिल्हा प्रशासनास तयाबाबत पत्र प्राप्त झाले आहे. त्यात गौणखनिजातून वसुलीचे उद्दिष्ट ३५ कोटींनी वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने आज दिली. 

गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्याला १६० कोटी महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले. जिल्ह्याची वसुली शंभर टक्क्यांवर करण्यात आली. २०२०-२१ मध्ये त्यात पंधरा कोटींनी वाढ करीत १८५ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी महसूल वसुलीचा आढावा घेतला. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील,जिल्हा गौण खनिज अधिकारी दीपक चव्हाण उपस्थित होते. 

उद्दीष्‍टात वाढ
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचे तहसीलदार व प्रांताधिकारी यांना महसूल वसुलीसाठी शर्तभंग व इतर प्रकरणे शोधण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. दंडात्मक नोटीस दिलेल्यांकडून सक्तीने वसुली करण्यात यावी. गेल्या आर्थिक वर्षात जिल्ह्याला गौण खनिजाबाबतच्या कारवाईतून ७० कोटी रुपये महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यंदा हे उद्दिष्ट ३५ कोटींनी वाढवले असून १०५ कोटींवर नेण्यात आले आहे. 
 
वाहनमालकांकडून सक्तीने वसुलीचे आदेश 
गौणखनिजाचा अवैध उपसा, वाहतूक प्रकरणात दंडात्मक नोटीस देण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या जास्त आहे. दंड वसूल झालेल्या प्रकरणांची संख्या निम्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे दंडात्मक नोटीस देण्यात आलेल्या वाहन मालकांकडून सक्तीने वसुली करा. गौणखनिज वसुलीसाठी अवैध उपसा व वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई वाढवण्याचे आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी दिले आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com