esakal | जळगाव जिल्ह्यात दहा लाखांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव जिल्ह्यात दहा लाखांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या

जळगाव जिल्ह्यात दहा लाखांपेक्षा अधिक कोरोना चाचण्या

sakal_logo
By
देविदास वाणी


जळगाव: जिल्ह्यात कोरोनाची (corona) साखळी खंडित होण्याकरिता जिल्हा प्रशासनाच्या (District Administration) कोरोनासदृश लक्षणे असलेल्या दहा लाख आठ हजार २८८ व्यक्तींची कोरोना चाचणी (Corona test) करण्यात आली. पैकी आतापर्यंत (११ मे) एक लाख ३१ हजार ५७४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. जिल्ह्यात प्रशासन व आरोग्य यंत्रणेने राबविलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर (Positivity rate) १३ टक्क्यांपर्यंत खाली आला असून, ही जिल्ह्यासाठी दिलासादायक बाब आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत (Collector Abhijit Raut) यांनी दिली.


(jalgaon district ten lakhs persons corona test positivity rate low)

हेही वाचा: खानदेशपुत्राचा सातासमुद्रापार कर्तृत्वाचा झेंडा.. संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारची मान्यता !

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून राज्याचे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘ट्रिपल टी’ (ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट)वर भर देण्यात आला आहे. बाधित आढळलेल्या व्यक्तींच्या संपर्कातील हाय रिस्क व लो रिस्क व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे स्वॅब कोरोना विषाणू प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. कोरोनासदृश लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींचीही चाचणी करण्यात येत आहे, जेणेकरून बाधित रुग्णांचा लवकरात लवकर शोध घेऊन त्याला वेळेत उपचार मिळाले तर रुग्ण लवकर बरा होतो. संशयितांची तपासणी लवकर होऊन त्यांचा अहवाल त्वरित प्राप्त व्हावा, याकरिता जिल्ह्यात रॅपिड ॲन्टिजेन टेस्टचे ग्रामीण व शहरी भागात शिबिर होत आहे.

कोरोना साखळी खंडित करण्यासाठी जिल्ह्यात दैनंदिन सात हजारांपेक्षा अधिक कोरोना संशयितांची चाचणी करण्यात येत आहे. आतापर्यंत करण्यात आलेल्या दहा लाख आठ हजार २८८ व्यक्तींच्या कोरोना तपासणीपैकी सात लाख सात हजार ९२ व्यक्तींची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करण्यात आली. यापैकी ७७ हजार ११४ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तीन लाख एक हजार १९६ व्यक्तींची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून, पैकी ५४ हजार ४६० व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. तसेच एक हजार ७७२ इतर अहवाल आढळले असून, सध्या एक हजार ४७१ अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी दिली.

हेही वाचा: कोरोनामुक्त गावांसाठी ‘अकरासूत्री कार्यक्रम’ फायदेशीर !


जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीस कोरोनासदृश लक्षणे आढळून येत असतील तर त्यांनी त्वरित नजीकच्या रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी करून घ्यावी. लवकर दाखल झालात तर लवकर बरे होऊन घरी जाल.
-अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, जळगाव