खडसेंनी दिले राष्ट्रवादीत जाण्याचे स्पष्ट संकेत; जयंत पाटलांच्या ट्विट केले रिट्विट !

भूषण श्रीखंडे
Wednesday, 21 October 2020

खडसे भाजपा सोडणार असल्यासे स्पष्ट संकेत असून त्यातून पंतप्रधानाच्या भाषणातून नविन काही मिळाले नसल्याचे त्यांच्या रिटिट्वट मधून दिसून येते.

जळगाव ः भाजपाचे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी काँग्रेसमधे जाण्याच्या वेगवाना हालचाली होताना दिसत आहेत. जयंत पाटलांनी पंतप्रधान मोंदीवर टिट्वट करून टिका केली. या टिट्वला एकनाथ खडसे यांनी रिट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाचे सूचक संकेत दिले आहेत. यामुळे पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

मंगळवारी नरेंद्र मोदींनी मंगळवारी यांनी देशवासियांना संबोधून भाषण केलं. या भाषणानंतर मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या  टिट्वीटमध्ये “आजच्या भाषणात पंतप्रधान काहीतरी नवीन सांगतील, करोना व आर्थिक संकटावर मात करण्यासाठी मार्ग देतील, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना दिलासा देतील असं वाटलं होतं. मात्र यापैकी त्यांनी काहीच केले नाही. महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला”. असे टिट्वट त्यांनी केले.

खडसेंचे रिटिट्वट हे सुचक संकेत

एकनाथराव खडसेंनी जयंत पाटलांनी पंतप्रधान मोंदीवर केलेल्या टिकेच्या टिट्वटला रिट्वट केले आहे. त्यामुळे खडसे भाजपा सोडणार असल्यासे स्पष्ट संकेत असून त्यातून पंतप्रधानाच्या भाषणातून नविन काही मिळाले नसल्याचे त्यांच्या रिटिट्वट मधून दिसून येते.

कार्यकर्ते देखील उत्सुक

खडसे समर्थक देखील खडसे राष्ट्रवादीत जाण्यासाठी उत्सुक आहे. खडसें कार्यकर्त्यांच्या पोस्टवरून आता भाजपचे कमळ चिन्ह नसल्याचे दिसत आहे. 

खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चीत 
खडसेंनी भाजप पक्ष वाढविण्यापासून ते विरोधीपक्षेते म्हणून एक वेगळा छाप त्यांनी सोडली. परंतू त्यांची दखल आता भाजपवालेच घेत नसल्याने राष्ट्रवादीत ते जाण्याचे सांगितले जात आहे.  त्यात शरद पवार यांनी खडसे प्रवेशाला हिरवा कंदील दाखविला आहे. 

भाजपचे नेते म्हणतात नाथाभाऊ कुठे ही जाणार नाही 
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी “नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत. ते भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची नाराजी दुर करण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहे.  त्यांच्याशी बोलणं सुरु आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभाही होतील” असे सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news jalgaon eknath khadse retweeted jayant patil's tweet and hinted to join NCP