esakal | एकनाथ खडसेंच्या कन्या ॲड.रोहिणी खडसे कोरोना पॉझीटीव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

एकनाथ खडसेंच्या कन्या ॲड.रोहिणी खडसे कोरोना पॉझीटीव्ह

अहवाल हा पॉझीटीव्ह आला असून त्या जळगाव येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. याबाबत रोहीणा खडसेंनी ट्वीट करून माहिती दिली आहे. 

एकनाथ खडसेंच्या कन्या ॲड.रोहिणी खडसे कोरोना पॉझीटीव्ह

sakal_logo
By
भूषण श्रीखंडे

 
जळगाव : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या कन्या व जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन ॲड.रोहिणी खडसे यांचा कोरोना बाधीत झाल्या आहे. त्यांचा अहवाल हा पॉझीटीव्ह आला असून त्या जळगाव येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या आहेत. याबाबत रोहीणा खडसेंनी ट्वीट करून माहिती दिली आहे. 

आवश्य वाचा- आम्हाला सरकार पाडण्याची काहीही गरज नाही, ते स्वःताहून पडेल- गिरीश महाजन -
 

जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या अॅड. रोहीणी खडसे या एकनाथ खडसेंसोबस राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने चर्चेत आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षात खडसे यांच्यासोबत कार्यकर्त्यांना भेटीच्या तडाखा लावत जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्ष मजबुत करण्यासाठी काही दिवसापासून त्यांचे काम जोरात चालू आहे. त्यात काही दिवसापासून मात्र त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी आपली कोरोनाची चाचणी केली. त्याचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. ॲड.रोहिणी खहसे यांनी स्वत: याबाबत ट्वीटव्दारे माहीती दिली आहे. 

हे ट्वीट केले
रोहीणी खडसेंनी ट्वीटव्दारे म्हटले आहे, कि माझी कोरोना चाचणी पॉझीटीव्ह आली असून प्रकृती चांगली आहे. मात्र सावधानता म्हणून मी रूग्णालयात उपचारासाठी दाखल झाली आहे.  

 
 

loading image